आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा अंतर्गत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे ऊस सुपरकेन नर्सरी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन!!

आत्मा अंतर्गत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे ऊस सुपरकेन नर्सरी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत जिल्ह्यातंर्गत शेतकरी प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी शेतकरी प्रशिक्षण मा. विजय हिरेमठ साहेब प्रकल्प संचालक आत्मा पुणे व नरेंद्र वेताळ साहेब तालुका कृषि अधिकारी आंबेगाव यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रस्तावीक सोपान लांडे साहेब मंडळ कृषी अधिकारी यांनी केले.

विकास हरिभाऊ चव्हाण वसंतराव नाईक शेतीनीष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी एकरी 126 टन खोडवा ऊसाचे व एकरी 110 टन ऊसाचे उत्पन्न कसे घेतले या विषयी अनुभव सांगीतले. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात एकरी 120 टनाच्या पुढे उत्पन्न घ्यायच्या असेल तर सुपर केन नर्सरी रोपवाटिका करणे महत्त्वाचे आहे याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यामध्ये प्रामुख्याने बेणे निवड बेणे प्रक्रिया नर्सरी बनवण्याची पद्धत इतर विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
जाधव वाडी गावचे प्रगतशील शेतकरी उत्तम जाधव यांनी जमिनीची सुपीकता खोडवा व्यवस्थापन ऊसपाचट व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रसन्न जाधव साहेब कृषी पर्यवेक्षक यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

यावेळी यूपीएल कंपनीचे तुषार खिलारी व राकेश पाटील यांनी ऊस रोपवाटिके साठी लागणाऱ्या औषधांची माहिती दिली व बीज प्रक्रियेचे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे धोंडीभाऊ पाबळे यांनी केले व या कार्यक्रमात राजश्री पवार कृषि सहाय्यक, मंडल अधिकारी व सर्व कृषि अधिकारी तसेच उपस्थित शेतक-यांचे श्री सतेज बाळकृष्ण दातखिळे यांनी आभार मानले.

यावेळी काठापुर गावचे कृषी मित्र हनुमंत थोरात,पिंपरखेडचे किसन शेळके,बाळूमामा खांडगे,देवगावचे कुणाल मुंगसे, लाखनगाव डॉक्टर गीताम सैद, दत्तात्रय हिंगे अवसरी बुद्रुक इतर शेतकरी हा कार्यक्रमास उपस्थित होते.

ऊस सुपरकेन नर्सरी रोपवाटिकेचे प्रात्यक्षिक पारगाव मधील बाळकृष्ण नामदेव दातखिळे यांच्या शेतावर घेण्यात आले त्यावेळी सर्व शेतकरी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.