शिरूर तालुक्यातील आरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांचे पद रद्द करण्याची मागणी..

आरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांचे पद रद्द करण्याची मागणी..
आरणगाव (ता. शिरूर) पोलिस पाटिल संतोष लेंडे यांच्या अल्पवयीन मुलीने पिकअप चालवित दुचाकीला धडक दिली होती. ३१ मे रोजी झालेल्या या अपघातात अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०) यांचा मृत्यू झाला होता, तर महेंद्र रावसाहेब बांडे (रा. वडगाव बांडे, ता. दौड) हे गंभीर जखमी झाले होते.
अरणगावचे पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीला पिकअप चालविण्यास दिली होती. ते स्वतः तिच्या बाजूला बसले होते. याप्रकरणी पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे व अल्पवयीन मुलगी यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. संतोष लेंडे यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली होती. दरम्यान, मृत अरुण मेमाणे यांच्या नातेवाइकांनी पोलिस पाटील संतोष लेंडे यांचे पद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. लेंडे यांनी या अपघाताबाबत माहिती न देता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. जखमी अरुण मेमाणे यांना वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.. यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या पोलिस पाटिल संतोष लेंडे यांचे पद कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी मेमाने यांच्या नातेवाइकांनी व समस्त ग्रामस्थ आरणगाव यांनी केली आहे.