आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

पंचनामा विशेष लेख – लय अवघड हाय गड्या समजाया बाप र!!

बाप…..
वडील ,पप्पा, डॅडी ऐकायला किती छान वाटतं ना पण आपण कधी कधी मुद्दाम होऊन जाणून बुजून करतो. बाप , आज अश्याच एका बापाची कहाणी.आई घरचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं.परंतु ह्या आस्तित्व ल जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का?

आईकडे अश्रूंचे पाठ असतात ती रडून मोकळे होते .परंतु बाप, बाप म्हणजे संयमाचा घाट असतो आणि रडणाऱ्यांपेक्षा सांत्वन करणारे जास्त महत्त्वाचे असतात .त्यांच्यावर जास्त भार पडत असतो .कारण ज्योती पेक्षा समई जास्त तापते ना परंतु श्रेय कोणाला मिळतं श्रेय नेहमी ज्योतीलाच दिलं जातं. काही लोकांनी बाप रेखाटलेला पण तापट ,व्यसनी, मारझोड करणारा, नाही समाजामध्ये एक दोन टक्के बाप असतीलही असे परंतु चांगल्या वडिलांबद्दल काय ?त्यांच्याबद्दल कोणीही काही लिहीत नाही .रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या सहज लक्षात येते ,परंतु आयुष्याच्या शिदोरीची सोय करून ठेवणारा बाप आपण किती सहज विसरून जातो ना. रात्री झोपल्यावर उशीमध्ये तोंड घालून मुसमुसणारा तो आमचा बाप असतो.

जिजाऊंनी शिवबाला घडवलं असं अवश्य सांगावं ,परंतु त्याचबरोबर शहाजीराजांचे ओढाताण लक्षात घ्यावी .यशोदेचा देवकीचं कौतुक आवश्यक करावं ,परंतु त्याच बरोबर भर पावसात मुलाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव आम्ही लक्षात घेतला पाहिजे .आमच्या वडिलांच्या तुटलेल्या चपलाच्या टाचा पाहिल्या त्यांचे फाटलेले बनियन पाहिले की आमच्या लक्षात येतं आमच्या नशिबाचे भोक आहेत ती त्यांच्या बनियन ला पडली आहे .त्यांचा दाढे वाढलेला चेहरा पाहिला तर त्यांची काटकसर लक्षात येते .माझे वडील कधी आजारी पडले तर हॉस्पिटलमध्ये जात नाही ते आजाराला मुळे घाबरतच नाही. कारण त्यांना काळजी वाटत असते की, डॉक्टरने महिनाभर घरात आराम करायला सांगितला तर काय करायचं .कारण मुलीचं लग्न राहिलेलं असतं मुलाचं शिक्षण बाकी असतं .ज्या घरामध्ये वडील आहेत ना त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमतही होत नाही कारण त्या घरातील कर्ता जिवंत असतो .

ठेच लागले ,भाजलं, थापड लागले तर आई ग.. हेच शब्द तोंडातून बाहेर पडतात. परंतु तोच रस्ता तोच हायवे क्रॉस करत असताना एखाद्या ट्रक वाल्याने अचानक येऊन ब्रेक लावला तर आमच्या तोंडातून बापरे हेच शब्द बाहेर पडतात. छोट्या छोट्या संकटांना आई चालते हो ,परंतु मोठमोठे वादळे पेलण्यासाठी बापच लागत असतो. कारण पटतंय ना शुभमंगल प्रसंगी संपूर्ण फॅमिली त्या फंक्शनसाठी जाते परंतु मताच्या वेळी मात्र वडीलच लागतात .खरंच… खरंच किती ग्रेट असतात ना वडील. स्वतःचा खिसा रिकामा असता नाही आपल्या मुलांना कधीही नाही म्हणणार नाही .म्हणूनच वडील ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि त्याच घरामध्ये आपल्या वडिलांना समजून घेणारी कोणी व्यक्ती असेल ना तर ती म्हणजे त्या घरातील मुलगी, त्या बापाची लाडाची लेक. मुलगी जर लग्न करून साजरी गेली असेल ना किंवा शिक्षणासाठी बाहेर गेले असेल ना तर फोनवर बदललेला वडिलांचा आवाज जिच्या लक्षात येतो ना ती फक्त त्या बापाची लाडाची लेक असते.बाप समजायला खुप सोपा असतो पण आपण अवघड पद्धतीने बाप समजून घेत असतो म्हणून म्हणतात कि लय अवघड हाय गड्या उमगाया बाप र..!

बाप नावाच्या विद्यापीठात तुम्ही एकदा का शिस्त नावाचा अध्याय शिकला तर तुमचं आयुष्य सुखकर होतं.आजवर किती कविता आई वर ऐकल्या असतील, वाचल्याही असतील. पण बापावर किती कवीनी कविता लिहिल्या. मुळात वडिलांचा सहवास लहाणपणापासूनच कमी लाभतो आपल्याला. आईच्या सहवासात मोठे होतो आपण. त्यामुळे आईचा लळा लागतो आपल्याला.

लहानपणी यात्रेत जायचो तेव्हा वडील आपल्याला खांद्यावर बसून देव दाखवतात. पण आता मोठे झाल्यावर समजत खुद्द देवाच्याच खांद्यावर बसून आपण देव पाहिलेला असतो.
ह्या मायावी जगात आपल्या भविष्याची चिंता करणारा आपला बाप असतो. आपण कोणतीही गोष्ट आईला पहिली सांगतो. पण जेव्हा सगळ्यात मोठी अडचण असते ना तेव्हा ती बापालाच सांगितली जाते.
गुरु ठाकूर लिहितात,
किती वर्णू गं महिमा त्याचा,
त्याच्या पायी घडले गं,
हरवून जाता त्याची सावली,
जगी एकटी पडले गं,
लई मोलाचा ऐवज असतो,
पुन्हा कधी ना मिळतो गं,
उमगाया सोपी आई,
बाप कुणाला कळतो गं,
जन्म घेई जे त्या साऱ्यावर,
त्याच्या गुणांची छाप दिसें,
सवाल होता फक्कड ज्याचा,
जवाब केवळ *बाप* असे..!
आईसाठी खूप लिखाण केलं जातं,
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण,
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला बाप महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.