अनेक सामाजिक उपक्रमांनी जेष्ठ क्रिकेटपटू श्रीपत म्हात्रे यांचा 72 वा वाढदिवस साजरा!!

अनेक सामाजिक उपक्रमांनी जेष्ठ क्रिकेटपटू श्रीपत म्हात्रे यांचा 72 वा वाढदिवस साजरा!!
एन्व्हाय हेल्थ केअर चे सक्रिय सभासद ज्येष्ठ आदर्श क्रिकेटपट्टू व मार्गदर्शक श्रीपत म्हात्रे यांचा 72 वा वाढदिवस 4 जुलै 2024 रोजी कळंबोली येथील झोपडपट्टीतील मुलांसोबत केक व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. तसेच तेथील मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने अजूनही तेथील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. या झोपडपट्टीतील मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच येथील लोकांच्या रिकाम्या हाताला रोजगार मिळावा जेणेकरून मूलभूत अधिकार अन्न वस्त्र निवारा व शिक्षण यापासून येथील लोकं वंचित राहू नये त्यासाठी एन्व्हाय हेल्थकेअर फाउंडेशन तसेच शितल सोशल हेल्प फाउंडेशन या माध्यमातून लवकरच प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास देऊन येथील लोकांना देऊन त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यात आले.
तसेच तृतीयपंथी अनन्या शिंदे यांचा सुद्धा वाढदिवस 4 जुलै रोजी असल्याने संथेच्या वतीने यांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा केला व तृतीयपंथी यांना समाजात जीवन जगत असताना होत असलेल्या समस्यांना समजून घेऊन लवकरच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून सन्मानाने समाजात जगता येईल असं मार्गदर्शन एन्व्हाय हेल्थकेअर फाउंडेशन व शितल सोशल हेल्प फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले. या सर्व उपक्रमांना प्रत्येक वेळी श्रीपत म्हात्रे यांना त्यांच्या कन्या डॉ मनीषा यांचे मोठे सहकार्य असते.