आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळाला दोन लाखाचा धनादेश!!

बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा नारोडीची कौतुकास्पद कामगिरी, ग्रामस्थ, कुटुंबीयांनी मानले आभार!!

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळाला दोन लाखाचा धनादेश!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा नारोडीची कौतुकास्पद कामगिरी, ग्रामस्थ, कुटुंबीयांनी मानले आभार!!

नारोडी (ता. आंबेगाव) : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा-धारकाच्या अपघाती मृत्युनंतर त्यांच्या कुटूंबियांना २ लाख रुपये विमा रकमेचा धनादेश बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नारोडी च्या वतीने देण्यात आला.

बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेत २० हजार खातेदार आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे विमाधारक हौशीराम महादू शेवाळे , रा. लांडेवाडी हे गेल्या २ ते ३ वर्षापासुन प्रतिवर्षी २० रुपये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत नियमित भरत होते. त्यांचा २० फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युपश्चात मुलगा सत्यवान हौशीराम शेवाळे आणि पत्नी बेबी हौशीराम शेवाळे यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नारोडी शाखा व्यवस्थापक श्री. स्वप्निल चोरे यांच्या हस्ते २ लाखाचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी बँकेचे अधिकारी सुनील पिंगळे, कॅशियर गौरम मेंगडे, मधुकर झडे तसेच इतर खातेदार उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना या विमा योजनेची माहिती नसतांना शाखा व्यवस्थापकांनी स्वतःहून माहिती देवून धनादेशाचे वितरण केले.

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ही ९ मे २०१५ पासुन सुरू केलेली टर्म इन्शुरन्स योजना आहे. ज्यामध्ये योजनेच्या मुदती दरम्यान अपघाती मृत्युच्या बाबतीत संरक्षण दिले जाते. ही योजना एक वर्षासाठी चालते आणि त्यानंतर सतत कव्हरेज साठी नूतनीकरण केले जाऊ शकते. प्रीमियम परवडणारा आहे आणि इन्शुअर केलेल्या बँक खात्यातून देय आहे. कव्हरेज कालावधीत मृत्यूच्या बाबतीत सम अँश्युअर्ड दिले जाते. १८ वर्षापासून ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. हे एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे जे कव्हरेज कालावधी दरम्यान केवळ मृत्यूचे संरक्षण करते. योजनेच्या अंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिट दिले जात नाही. कव्हरेज एक वर्षासाठी प्रत्येक वर्षी १ जून रोजी सुरू होते आणि पुढील वर्षाच्या ३१ मे रोजी संपते.

योजनेसाठी प्रीमियम विमा धारकांच्या बँक खात्या द्वारे देय आहे. प्रीमियम ची रक्कम केवळ वार्षिक रू.२० आहे आणि विमा धारकाच्या बँक खात्यातून स्वयं-डेबिट सुविधेने डेबिट केली जाते. इन्शुअर व्यक्तीला ऑटो-डेबिट सुविधा मंजूर करावी लागते जेणेकरुन जेव्हा कव्हरेज सुरू होते आणि जेव्हा नूतनीकरण केले जाते तेव्हा देखील प्रीमियम डेबिट केला जाऊ शकतो. ऑटो-डेबिटची मंजूरी १ जूनपूर्वी देण्यात यावी जेणेकरुन १ जूनपासून कव्हरेज सुरू होईल आणि संपूर्ण वर्षासाठी चालविले जावे.

“प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या सर्व सामाजिक सुरक्षा योजना या शासकीय योजना असून त्या राष्ट्रीयकृत बँके तर्फे राबविण्यात येतात. या मुळे सदर व्यक्ती च्या कुटुंबांना मृत्यूपश्चात विमा योजनेत लाभ होतो.सदर योजनेचा जास्तीत जास्त खाते धारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.”- श्री. स्वप्निल चोरे शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र नारोडी शाखा

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.