आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे फळझाडांची वृक्षारोपण!!

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शिरदाळे येथे फळझाडांची वृक्षारोपण!!

काल ५ जून जागतिक पर्यावरण दिन संपन्न झाला. याच पार्श्वभूमीवर आदर्श ग्रामपंचायत शिरदाळे तसेच वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरदाळे गावच्या तलाव परिसरात फळझाडांची वृक्षारोपण करण्यात आले.

धामणी वनपरिक्षेत्राच्या वनपाल सौ.सोनाली भालेराव यांच्या सूचनेनुसार शिरदाळे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री.वाफगावकर साहेब यांच्या शुभहस्ते या वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी शिरदाळे या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकाराची वनराई उभारण्याचे काम करत असून ग्रामस्थांनी देखील आम्हाला सहकार्य करावे ज्याचा फायदा भविष्यात गावाला होईल असे भालेराव मॅडम यांनी सांगितले. तर वनविभाग कायमच शिरदाळे ग्रामस्थांना सहकार्य करत असून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी ही ग्रामस्थांची असून ग्रामस्थांची त्या झाडांची काळजी घेण्याची गरज असल्याचे मा.सरपंच मनोज तांबे यांनी सांगितले. तर हा उपक्रम राबवत असताना गावातील आम्ही तरुण देखील पावसाळा सुरू झाल्यावर अजून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणार असून वनविभागाने आम्हाला झाडे पुरवावीत तसेच आमचे गावातील तरुण देखील चांगल्याप्रकारे झाडांची काळजी घेतली असे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.

हा कार्यक्रम वनविभागाने घेतल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी श्री.वाफगावकर साहेब,वनपाल सौ.सोनाली भालेराव,मा.सरपंच मनोज तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे,पूजा पवार मॅडम,शिपाई दिलीप वाघ साहेब,मा.उपसरपंच सुभाष तांबे,अनिकेत चौधरी,जेष्ठ नागरिक महादू सरडे,बबन रणपिसे,जया रणपिसे,पूजा सरडे,योगिता तांबे,सीमा तांबे,राज तांबे हे उपस्थित होते.

शिरदाळे गावाला कायमच वनविभागाचे मोलाचे सहकार्य असते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अयोजिक करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. गावातील तरुण सहकाऱ्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या ग्रुप अंतर्गत एकत्र येऊन भविष्यात वृक्षलागवड करण्यात येणार असून उन्हाळ्यात देखील पक्षांसाठी खाद्य ठेवण्याची उपक्रम केला होता. पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा तरुणांचा प्रयत्न असणार आहे.
श्री. मयुर सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.