आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

के.के.वाघ विद्याभवनात पर्यावरण दिन उत्साहात साजरा !!

के.के.वाघ विद्याभवनात पर्यावरण दिन उत्साहात साजरा !!

निफाड.ता-६.कर्मवीर काकासाहेब वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर येथे हरितसेना अंतर्गत ५ जून जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याभवनाचे प्राचार्य अशोक बस्ते तर प्रमुख अतिथी फॉरेस्ट अधिकारी एन.एन. गांगुर्डे, वनरक्षक कल्पना पाईकराव, हरित सेना प्रमुख गोविंद कांदळकर,ज्येष्ठ शिक्षक बस्तीराम रानडे, प्रवीण रणदिवे,राजेंद्र उगले,जयश्री वऱ्हाडे,शितल बिरारी,रत्ना धाबळे उज्वला दिवे,शितल साळी उपस्थित आदी होते.

प्रसंगी परिसरात वृक्षदिंडी काढून ‘झाडे लावा, ‘झाडे जगवा’ अशा घोषणा हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी देऊन जनजागृती केली. प्राचार्य अशोक बस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच फॉरेस्ट अधिकारी एन.एन.गांगुर्डे यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड करणे किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.उपस्थित सर्वांनी शालेय परिसरात प्रत्येकी एक एक झाड लावून ते जतन करण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरित सेना प्रमुख गोविंद कांदळकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनविभागातील विशाल पाटील तसेच हरितसेनेतील साहिल वकटे,साहिल कांदळकर ,सहित ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

वृक्षरोपण प्रसंगी प्राचार्य अशोक बस्ते, वनाधिकारी एन एन गांगुर्डे, वनरक्षक कल्पना पाईकराव हरित सेना प्रमुख गोविंद कांदळकर, बस्तीराम रानडे, प्रवीण रणदिवे,राजेंद्र उगले,विदयार्थी आदी.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.