आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते चेहडी खुर्द येथे थ्री.डी.अंगणवाडीचे भूमिपूजन संपन्न!!

नाशिक (प्रतिनिधी)- निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द येथे जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मौजे चेहडी खुर्द येथे थ्रीडी अंगणवाडी काम मंजूर झाली असून सदर कामाचे भूमिपूजन माननीय मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यकारी अभियंता पंकज मेतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, महिला व बालकल्याण विभाग शिक्षणाधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नाशिक डॉ.नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव,सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील, पंचायत समिती माननीय उपअभियंता जिल्हा परिषद नाशिक आर. यु.पुरी,गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड,निफाड पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे, बीट सायखेडा केंद्रप्रमुख सौ ठाकरे,ग्रामपंचायत अधिकारी राखी विलास बोंद्रे, जि. प. शाळा चेहडी संगीता रजपूत, चेहडी माजी सरपंच रवींद्र रूमने अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती दशरथ रुमणे, गोविंद शिंदे यादव रूमणे किरण सानप दामोधर रूमणे नितीन रूमणे, जि. प शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका, आशा सेविका बचत गटाच्या महिला सदस्य मान्यवर चेहडी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्हात एकूण दोन थ्री. डी अंगणवाडी असून त्या एक चेहडी खुर्द येथे होत आहे.या प्रकल्पामुळे गावाला एक ओळख मिळणार असल्याने चेहडी गावाकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नाशिक यांचे आभार मानले..

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.