आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

हुमणी कीडीच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रँपचा वापर!!

हुमणी कीडीच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रँपचा वापर!!

प्रतिनिधी -समीर गोरडे

वायाळमळा ता.आंबेगाव येथे हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रॅपचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक छाया चव्हाण यांनी करून दाखवले .तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हुमणीचा प्रथमावस्थेत या सुरुवातीच्या काळात कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करतात व त्यानंतर उसाची तंतुमय मुळे खातात हे भुंगेरे बाभूळ ,कडुलिंब, बोर, आदी झाडांवर उपजीविका करतात. वळवाचा पहिला पाऊस सुरू होताच म्हणजे साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात.

हुमणीची एक अळी प्रति चौरस मीटर क्षेत्रात आढळल्यास तसेच झाडांवर सरासरी वीस किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास कीड व्यवस्थापनाचे उपाय करावेत. मंडळ कृषी अधिकारी मंचर श्री.एस.बी. बिराजदार यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, हुमणी कीडनियंत्रण ,शेणखत हिरवळीचे खत यांचा वापर ,सेंद्रिय खतांचा वापर, महाडीबीटी ,कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड ,ठिबक सिंचन, तुषार सिंचन या योजना विषयी मार्गदर्शन केले .वैभव वायाळ, बाळासाहेब वायाळ, विकास वायाळ, जयसिंग वायाळ, अमोल वायाळ ,सुनील शेलार, उत्तम वायाळ यांनी हुमणी कीड नियंत्रणासाठी लाईट ट्रॅपचा वापर प्रात्यक्षिक केलेले आहे. तसेच इतरही शेतकऱ्यांनी हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रॅपचा वापर करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री नरेंद्र वेताळ यांनी केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.