आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे घाटात बिबट्याची दहशत!!प्रसंगावधाणामुळे बिबट्याचा हल्ला फसला!!

शिरदाळे घाटात बिबट्याची दहशत!!प्रसंगावधाणामुळे बिबट्याचा हल्ला फसला!!

दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढतच चालली असून आता ही भीती डोंगरावर असलेल्या शिरदाळे परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. 2,3 वर्षांपूर्वी बिबट्या फक्त ऊस प्रवण क्षेत्र आणि जास्त दडन असलेल्या परिसरात पाहायला मिळत होता परंतु आता बिबट्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की तो कुठेही सर्रास पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी,गुराखी मंडळींमध्ये भीतीचे वातावरण आहे.


काल रात्रीच्या नऊच्या सुमारास शिरदाळे धामणी घाटात घरी जात असताना शिरदाळे मा.उपसरपंच मयुर सरडे आणि राजू चौधरी यांच्या गाडीवर बिबट्या हल्ला करण्याचा तयारीत असताना राजू चौधरी यांच्या प्रसंगावधान आणि मयुर सरडे यांनी त्यांच्या डोळ्यावर गाडीची लाईट लावल्याने त्याची उडी फसली व बिबट्याने दरीच्या बाजूला धूम ठोकली. अगदी चार पाच फुटांवरून हा बिबट्या या दोघांनी पाहिल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या आठ नंतर दूध घालणारे शेतकरी,कामगार वर्ग यांचे ये जा या रस्त्याने असते त्यामुळे त्यांच्यात देखील भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून काळजी घेण्याची गरज असून वनविभागाने देखील काही तरी उपाय योजना करण्याची गरज आहे. रस्त्याने घाट परिसरात हॉर्न वाजवून गाडी चालवावी तसेच रात्रीच्या वेळी गाडीचे इंडिकेटर देखील चालू असावेत असे आवाहन मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी केले.

रात्रीचा प्रसंग खूपच भीतीदायक होता. गेली दहा वर्षे या रस्त्याने मी रोज ये जा करत असतो परंतु इतर जंगली प्राणी बऱ्याचदा पाहायला मिळत होते. परंतु बिबट्याचे दर्शन प्रथमच एवढ्या जवळून झाले आहे. प्रत्येकाने घाटातून जाताना आपली काळजी घेऊन जावे. सोबतीला कोणी तरी घेऊन प्रवास करावा. बिबट्याचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असून वनविभागाने यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. शिरदाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढत चालली असून जनावरे सांभाळणारे शेतकरी भीतीच्या छायेत असतात. जंगल परिसर घनदाट झाल्यामुळे त्यांना लपण्यासाठी मुबलक जागा आहे.
श्री.मयुर सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.