आरोग्य व शिक्षण

लोणी (ता.आंबेगाव) हद्दीत बेल्हा – जेजुरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार!!

लोणी (ता.आंबेगाव) हद्दीत बेल्हा – जेजुरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार!!

बेल्हे ते जेजुरी महामार्गावर लोणी (ता. आंबेगाव) च्या हद्दीत गुरुवारी दि.२ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत लागून ७ ते ८ महीने वयाचा बिबट्याचा बछडा ठार झाला आहे.

बेल्हे ते जेजुरी महामार्गावर लोणी गावाच्या हद्दीवर आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या बछड्यास अज्ञात वाहनाची धडक लागल्याने गंभीर जखमी झाला. तो जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असल्याची माहिती समजल्यानंतर मंचर लाखणगाव विभागाच्या वनरक्षक साईमाला गित्ते यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहिले, असता त्यांना तो मृत अवस्थेत आढळून आला. बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.