आरोग्य व शिक्षण

रोज पडणाऱ्या धुक्याने वाढवली बळीराजाची चिंता!!

फवारणीचा खर्च वाढला,उत्पादनातही होणार घट!!

रोज पडणाऱ्या धुक्याने वाढवली बळीराजाची चिंता!!

फवारणीचा खर्च वाढला,उत्पादनातही होणार घट!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पहाटे दाट धुके पडत असल्याने बळीराजा समोरील चिंता वाढली आहे. दाट धुके पडत असल्याने सध्या शेतात असणाऱ्या नगदी पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शीपणीचा व भांडवलाचा खर्च वाढला आहे या सर्व समस्यांमुळे बळीराजा मात्र चिंतेत पडला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने ऊस, मेथी, धना, कोबी, फ्लॉवर,बीट, वालवड, दुधी भोपळा, दोडका, कांदा आदी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. भाजीवर्गीय पिकांची रेलचेल मोठया प्रमाणात आहे. सध्या दाट धुके पडत असल्याने कांदा, धना, मेथी या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे. पिकांवर रोगराई पसरू नये यासाठी फवारणी करावी लागते आहे. फवारणीचा वाढलेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले असल्याचे चित्र दिसून येते आहे.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.