आरोग्य व शिक्षण

आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर गावास महसूली गावाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर गावास महसूली गावाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बैठक संपन्न झाली.

वाळुंजनगर गावाला स्वतंत्र महसूल गाव नकाशा व सातबारा तयार होत नाही. तसेच महसुली कोड व ग्रामपंचायत सेन्सेक्स नंबर नाही. यासाठी वाळुंजनगर ग्रामस्थांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी लांडेवाडी येथे मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन विविध अडचणी मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी पुणे यांना पत्रव्यवहार करून बैठकीची मागणी आढळराव पाटील यांनी केली होती.

या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये पुढील दहा दिवसांमध्ये आंबेगाव तहसीलदार यांनी गाव नकाशे, लोकसंख्या व इतर प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी देत त्यानंतर तातडीने नोटिफिकेशन काढण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.