ताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव)च्या खंडोबा मंदिराचे महाद्वार झळाळले !

धामणीच्या खंडोबा मंदिराचे महाद्बार झळाळले !

मंचर : धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिराच्या मुख्य दोन्ही महाद्बाराच्या मध्यभागी देवाच्या मानाच्या काठीचे मानकरी राजगुरु मंडळीने कायमस्वरुपी एलईडी अँक्रेलीक वाँटरप्रुफ “जय मल्हार” जयघोषाचा बोर्ड
रविवारी बसविला असल्याने मंदिराचे महाद्बार झळाळून गेल्याचे भाविकांना पहायला मिळाले अवसरी खुर्द ( तालुका आंबेगांव) येथील धामणीच्या खंडोबाच्या मानाच्या काठीचे मानकरी व श्री खंडेराय काठी मंडळाचे समस्त राजगुरु मंडळीनी सुमारे ८००००/ च्या लोक वर्गणीतून हा एलईडी अँक्रलीक बोर्ड बसवलेला असल्याचे देवाचे सेवेकरी भगत वाघे मंडळीनी यावेळी सांगितले यावेळी मानकरी पांडुरंग राजगुरु,सोमनाथ राजगुरु,योगेश राजगुरु,स्वप्नील राजगुरु,निलेश राजगुरु,नवनाथ राजगुरु,आतिश लोंढे,स्वरुप राजगुरु,विनायक राजगुरु,नितेश राजगुरु व शिवराज राजगुरु यांच्यासह समस्त राजगुरु मंडळी उपस्थित होती या सर्व मानकरी व एलईडी बोर्ड देणगीदाराचा धामणी ग्रामस्थांच्या वतीने खंडोबाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,माऊली जाधव वाघे प्रभाकर भगत यांनी मानाचा फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.