आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भय इथले संपत नाही!! खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील श्री. हनुमंत बाळा सुक्रे यांच्या गोठ्यावर बिबट्याचा हल्ला!!

भय इथले संपत नाही!!
खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील श्री. हनुमंत बाळा सुक्रे यांच्या गोठ्यावर बिबट्याचा हल्ला!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या खडकवाडी येथील शेतकरी श्री.हनुमंत बाळा सुक्रे यांच्या गोठ्यावर रात्री एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून एक शेळी जखमी झाली आहे. यात सुक्रे यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या परीसरात बिबट्या आणि वन्य प्राण्यांसाठी दडन, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यामुळे बिबट्याचे या परीसरात नेहमीच वास्तव्य असते. सर्व शेतकरी व पशुपालक यांनी सतर्क राहावे तसेच जनावरांना सुरक्षित जागी निवारा द्यावा असे आवाहन यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला योग्यती लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी खडकवाडी चे मा.सरपंच अनिल डोके, उपसरपंच एकनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज, ग्रामसेवक संतोष तुळेकर यांनी वनपाल साईमाला गीते यांच्याकडे केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.