आरोग्य व शिक्षण

18 व्या स्काउट गाइड च्या राष्ट्रीय जांबोरी साठी श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी(धामणी) च्या स्काउटस आणि गाइडस चा सहभाग!!

18 व्या स्काउट गाइड च्या राष्ट्रीय जांबोरी साठी श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी च्या स्काउटस आणि गाइडस चा सहभाग!!

18 वी राष्ट्रीय स्काउट आणि गाइड ची जांबोरी रोहट जि. पाली राजस्थान या ठिकाणी 04 जानेवारी 2023 ते 10 जानेवारी 2023 संपन्न होत आहे. या 18 व्या राष्ट्रीय जांबोरी साठी महाराष्ट्रतील पुणे जिल्ह्यातील एकूण 14 शाळा सहभागी जाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यातील श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी(धामनी) या प्रशालेतील एकूण ९ स्काउटर, ९ गाइडर आणि मार्गदर्शक श्री पारधीसर व शिंदे मॅडम सहभागी झाले आहेत.
या 18 व्या राष्ट्रीय जांबोरी चे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रोपदीजी मुर्मू यांच्या हस्ते जाले. तसेच या उद्घाटन प्रसंगी राजस्थान चे राज्यपाल मा. कालराजजी मिश्रा व राजस्थान चे मुख्यमंत्री मा. अशोकजी गहलोत उपस्थित होते. या राष्ट्रीय जांबोरीसाठी 10 देशासह 50 हजार स्काउट आणि गाइड सहभागी जाले आहेत.
या राष्ट्रीय जांबोरी मध्ये प्रशालेतील स्काउटर आणि गाईडर ने डान्स , शोभायात्रा, संचलन, कलरपार्टी, वस्तुप्रदर्शन, पदार्थप्रदर्शन, कैम्पफायर, या मध्ये महाराष्ट्रचे नेतृत्व याठिकाणी केले आहे.

या जांबोरीसाठी गृहविभागाचे सहसचिव मा. कैलास गायकवाड साहेब, माजी विद्यार्थी विकास प्रोबोधनीचे अध्यक्ष उदयसिंहराजे वाळुंज, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा. रोहिदास वाळुंज , पालक सुधीर सोनार, प्रशालेचे मुख्याध्यापक मा. सु. ज. वेताळ सर, जेष्ठ शिक्षक साकोरे सर, डुबरे सर या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.