आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आईपासून दुरावलेल्या मुलीची पोलिस बांधवानी घालून दिली भेट!!पोलिस बांधवानी घडविले माणुसकीचे दर्शन!!

आईपासून दुरावलेल्या मुलीची पोलिस बांधवानी घालून दिली भेट!!

पोलिस बांधवानी घडविले. माणुसकीचे दर्शन!!

नाशिक : ओझर पासून काही अंतरावर असलेल्या दहावा मैल
येथे एक ३० वर्षीय मनोरुग्ण महिला परिसरात बसलेल्याचे आढळले असता ओझर पोलिसांनी भेट घेत चौकशी केली असता असे निर्दशनास आले की त्या महिलेस तिचे पूर्ण नाव, पत्ता सांगता येत नव्हते. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत मनोरुग्ण महिलेस त्याच्या कुटुंबीयांचा ताब्यात दिले.

शुक्रवार (दि.१०) मध्यरात्री दहावा मैल ओझर येथे एक मनोरुग्ण महिला बेवारस अवस्थेत बसली असल्याची माहिती एका इसमाने पोलिसांना कळविली. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पोलिसांना पाठवून या महिलेला ओझर पोलिस ठाण्यात आणले. तिची चौकशी केली परंतु महिला मनोरुग्ण असल्याने ती फक्त आपले नाव आरती एवढेच सांगत होती. पोलिसांनी महिलेला नाशिक मधील आश्रमामध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला असता नाशिक मधील कोणतीही संस्था या महिलेस दाखल करून घेण्यास तयार होत नव्हती. त्यामुळे तिच्या कुटंबीयांचा शोध सुरू असताना नाशिक मध्ये शोधताना तिची ओळख पटविणे सुरू होते. त्याचं वेळी बडी दर्गा, भद्रकाली पिंजरा घाट रोड, येथील रहिवाशांनी सांगण्यानुसार तिच्या आई वास्तव्यास असल्याचे दिसून आले. ओळख पटवून तिच्या कुटंबीयांकडे सोपवण्यात आले.
ओझर पोलिस ठाण्याचे महिला हवालदार माधुरी सोनवणे व पोलिस शिपाई संदीप बोडके या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. मुलगी व आईची भेट घडवून आणल्याने मायलेकींनी पोलिसांचे आभार मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.