आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार:हवामान विभागाचा अंदाज; आज मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार:हवामान विभागाचा अंदाज; आज मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढग जमा होत असून, तुरळक ठिकाणी आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर उर्वरित विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ वर्धा, नागपूर.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

नंदूरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.