आत्मविश्वास व कौशल्य असल्यास उद्योजक बनणे अवघड नाही – विनायक खाडे

आत्मविश्वास व कौशल्य असल्यास उद्योजक बनणे अवघड नाही – विनायक खाडे
जेएसपीएमच्या राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालय व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन सेल यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावेत यासाठी यशस्वी बांधकाम व्यावसायिक व इंजिनिअर विनायक खाडे यांच्यामार्फत प्रोत्साहन पर व्याख्यान आयोजन केले होते.
इंजिनीयर विनायक खाडे यांनी 2009 साली वात्सल्य कॉन्स्ट्रोटेक नावाची कंपनीची स्थापना केली व पंधरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी कोट्यवधी उलाढाल करत व अनेक प्रकल्प पूर्ण केले. सध्या त्यांच्याकडे संपूर्ण पुण्यात 53 वेगवेगळ्या बांधकाम साइट सुरू आहेत.
स्वतःचे मनोगत व्यक्त करताना त्यांनी आयुष्यामध्ये आलेल्या अनेक अवाहनांना कसे सकारात्मक रित्या तोंड दिले तसेच शिस्त, मेहनत व वेळेचे योग्य नियोजन याजोराव यश संपादन करू शकता असे सांगितले. त्यांनी मुलांना कौशल्य व आत्मविश्वास असेल तर तुम्ही देखील यशस्वी उद्योजक बनू शकाल याचा कानमंत्र दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर ए डुबल यांनी दिले यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय मार्फत देण्यात येणाऱ्या सहा महिन्याच्या इंडसशिप मुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कौशल्य विकसित करण्यास मदत होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर प्रीती गजघाटे यांनी दिले. कार्यक्रमाला कॅम्पस डायरेक्टर डॉ आर के जैन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.