आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण आठव्या दिवशीमागे!!

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या ठोस आश्वासनाअंती मागे !!

जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण आठव्या दिवशी महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या ठोस आश्वासनाअंती मागे !!

खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव आठ दिवसांपासून उपोषण आंदोलन करत होते.ह्या आंदोलनाला शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. उत्तर पुणे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बांधव गावावरून दररोज आंदोलन स्थळी येत होते.

ह्या सर्व शेतकरी बांधवांची शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन काळात भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांच्या तीव्र प्रतिक्रिया जाणून घेतल्या व पाणी प्रश्न तातडीने सुटावा म्हणून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तत्परतेने शेतकऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नांसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली व शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना उपोषणाच्या आठव्या दिवशी उपोषणकर्ते देविदास दरेकर व आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पाठवले.

त्यानुसार उपोषणाच्या आठव्या दिवशी मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आझाद मैदान, मुंबई येथे दाखल झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत या सर्व प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी मंत्रालय मुंबई येथे पुढील आठवड्यात उपोषणकर्ते शेतकरी यांना बैठकीचे निमंत्रण देणार असल्याचे सांगितले तसेच आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार व खेड तालुक्यातील गावांना वरदान ठरणारा कळमोडी प्रकल्प मार्गस्थ करण्यासाठी तसेच डिंभे धरणातील प्रस्तावित बोगद्याच्या कामामुळे आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही याबाबत सरकार शेतकरी हिताची भूमिका घेईल असे ठोस आश्वासन दिले असल्याने शेतकरी बांधवांनी उपोषण स्थगित करावी अशी विनंती केली.

यावेळी बोलताना देविदास दरेकर यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणत सहभाग नोंदविल्यामुळे शेतकरी बांधवांचे आभार मानले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस आश्वासन दिल्यामुळे आपण समाधानी असल्याचे सांगितले व आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. श्री.दरेकर शेतकऱ्यांच्या उदंड प्रतिसादामुळे व कळमोडी प्रकल्प शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गस्थ होणार असल्याने भाऊक झाले होते.

याप्रसंगी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, शिरूर तालुक्याचे जेष्ठ नेते सोपानराव जाधव, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, उद्योजक भाऊसाहेब सावंत पाटील, नवी मुंबई येथील नगसेविका शिल्पा प्रकाश मोरे, मा.सरपंच संजय कडुसकर, बबनराव कोकणे, शांताराम पठारे, रंगनाथ चिखले, उपोषणकर्ते रवि तोत्रे, आप्पा तोडकर, सूर्यकांत ढमाले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.