आरोग्य व शिक्षण

धामणी(ता.आंबेगाव) जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचा जल्लोष २०२३ कार्यक्रमात अवघ्या काही क्षणांत जमले १.५० लाख रुपये!!

धामणी जि.प.शाळेचा जल्लोष २०२३ कार्यक्रमात जमले १.५० लाख रुपये!!

धामणी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम हा कौतुकाचा विषय राहिला आहे. याहीवर्षी मोठ्या उत्साहात सायंकाळी ६ ते १० या वेळेत संपन्न झाला कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी ला तब्बल १:५० लक्ष रुपयाची देणगी दिली.

प्राथमिक शाळा धामणी मध्ये अनेक वैविध्य उपक्रम राबविण्यात येतात त्याचे कौतुक सर्व स्थरातुन होत असते. या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत उत्साहात संपन्न झाले विशेषतः महीलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. कौतुकाची गोष्ट म्हणजे संपुर्ण संस्कृतीक कार्यक्रमाचे निवेदन ईश्वरी गाडेकर व स्वरा रोकडे यांनी केले. कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था असल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भालचंद्र प्रभाकर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गावठाण अंगणवाडी च्या मुलांच्या गाण्याने झाली. लहान मुलांचे नृत्य पाहुन ग्रामस्थ हरखून गेले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकुण १५ गाणी, नाटक सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य पाहुन पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रत्येक नृत्यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसांची खैरात केली.

या कार्यक्रमात काही सन्मान करण्यात आले. तामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये टिव्हीएस कंपनीच्या च्या सीएसआर फंडातून विविध विकास कामांसाठी तब्बल १५ लक्ष ची कामे केल्याबद्दल कंपनीचे अधिकारी योगेश्वर पाटिल, सोमनाथ काटकर, अविनाश लाकुडझोडे,नवनाथ राक्षे, संगिता वाळूंज यांचा त्याचप्रमाणे वर्षभर विद्यार्थ्यांसाठी मोफत संस्कार शिबीर घेतलेल्या सुनिताताई विधाटे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा कथले यांना धामणी ग्रामस्थांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शाहीर दिनेश जाधव यांना सन्मान चिन्ह देण्यात आले.

शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या समृद्धी राजेश गवंडी, स्वरांजली आनंदा जाधव, आदिराज सुशांत जाधव, खुशी भाऊसाहेब कदम, हर्षद शरद जाधव, सई अजित बोऱ्हाडे, विशाखा सोमनाथ बांगर, वैष्णवी सोमनाथ बांगर, ओम जगदिश रणपिसे यांना सन्मानित करण्यात आले.
‌ विशेषतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आदर्श विद्यार्थी व विद्यार्थ्यानी पुरस्कार देण्यात आला. आदर्श विद्यार्थी म्हणुन श्रेयश दत्तात्रय चौरे व आदर्श विद्यार्थीनी ईश्वरी दत्तात्रय गाडेकर यांना पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, पारगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहु थाटे, अॅड विठ्ठलराव जाधव पाटिल, न्यायाधीश गोरक्ष लंघे, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, उद्योजक विजय जाधव, उद्योजक शांताराम जाधव, उद्योजक विलास पगारिया, संदिप पवार गुन्हे अन्वये विभाग अधिकारी ,वनरक्षक पुजा पवार, मा . सरपंच सागर जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, शालेय व्यवस्थापान कमेटी चे अध्यक्ष महेश कदम, उपअध्यक्ष स्वाती विधाटे , प्राचार्य डी.आर.गायकवाड, डॉ. शिवाजी थिटे, दिलीप डोके साहितीक , स्मीता वाघ , उद्योजक महेश पाटील, उद्योजक प्रमोद वाघ, उद्योजक प्रदिप भुमकर, उद्योजक आण्णा बोऱ्हाडे, उद्योजक संतोष जाधव, अक्षय करंजखेले उद्योजक , आहेअॅड.. भुषण तांबे, उद्योजक संदीप बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे,सुरेखा ताई रोडे, उषा बोऱ्हाडे,मा.उपसरपंच मिलिंद शेळके ,आनंदराव जाधव मा . ग्रा.प.सदस्य, राहुल जाधव , निलेश रोडे , संदिप गाढवे , महिपत बढेकर , देविदास करंजखेले , शरद जाधव ,अमोल जाधव , सोमनाथ सोणवने , माधव बोऱ्हाडे , सोमनाथ जाधव , रोहित भुमकर , शिक्षिका विजया हिंगे , कोठावळे मॅडम, केदारी मॅडम , बोऱ्हाडे मॅडम , रोकडे मॅडम , सोणवने मॅडम शेवटी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.सरपंच अंकुशराव भुमकर यांनी केले .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.