आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

समर्थ युवा पर्यटन क्लब च्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा! वैभवशाली पर्यटन जुन्नरचे यावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन!!

पर्यटन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यटन स्थळांचे जतन करावे-यश मस्करे

समर्थ युवा पर्यटन क्लब च्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा!!
वैभवशाली पर्यटन जुन्नरचे यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन!!
पर्यटन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यटन स्थळांचे जतन करावे:यश मस्करे

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या युवा पर्यटन क्लब अंतर्गत स्थापित समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग बेल्हे युवा पर्यटन क्लब व जुन्नर तालुका पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच “वैभवशाली जुन्नरचे पर्यटन” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्‍करे व लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आले.कार्यशाळेच्या सुरुवातीलाच पर्यटन क्लब मधील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गीत सादर केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,विद्यार्थी विकास अधिकारी गणेश बोरचटे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि समर्थ संकुलातील युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे विद्यार्थ्यांना जुन्नर चे वैभवशाली पर्यटन याविषयी माहिती देताना म्हणाले की,जुन्नर तालुका महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून २०१८ मध्ये जाहिर करण्यात आलेला आला.विविधता असणारी अनेक पर्यटन स्थळे तालुक्यात आहेत.निसर्ग पर्यटन,धार्मिक पर्यटन,कृषी पर्यटन,वन पर्यटन,सांस्कृतिक पर्यटन,शैक्षणिक पर्यटन,साहसी पर्यटन,ऐतिहासिक पर्यटन,विज्ञान पर्यटन अशा अनेकविध पर्यटनांनी नटलेल्या जुन्नर तालुक्याचे निसर्ग सौंदर्य सर्वाना भुरळ घालते.पर्यटन म्हणजे कुठे बाहेर गेलं पाहिजे असं नाही.निसर्गामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या डोळस बुद्धीने पहायला शिकलं पाहिजे.आपण स्थापन केलेल्या पर्यटन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यटन स्थळांचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.जबाबदार पर्यटन व्हायला पाहिजे.आपल्याकडे असणारी संस्कृती,पर्यटन स्थळ त्यांची संस्कृती म्हणून जपणूक करायला हवी तरच लोक ते पाहायला येतील व त्या माध्यमातून नवीन उद्योगधंदे तसेच पर्यटनाच्या नवीन संधी निर्माण होतील असे यश मस्करे यांनी सांगितले.
लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी विद्यार्थ्यांना जुन्नरच्या वैभवशाली इतिहासातील धार्मिक,ऐतिहासिक,सांस्कृतिक बाबींची माहिती दिली.जैवविविधता,भौगोलिक परिस्थिती त्याचप्रमाणे अडीच हजार वर्षांपूर्वीचा जुन्नर चा इतिहास याबाबत मार्गदर्शन केले. शिवनेरी किल्ला,नाणेघाट,आंबा-अंबालिका लेणी,कुकडेश्वरचे मंदिर,नारायण गड,जीवधन,हडसर चावंड इत्यादी किल्ल्यांची माहिती,सातवाहन राजघराण्याचा इतिहास,टेफ्रा राखेचा इतिहास,सह्याद्रीच्या डोंगररांगा याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.
राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्रा.गणेश बोरचडे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.