आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

नोकरी कोतवालाची….परंतु काम एका समाजसेवकाचे,समाजसेवकासारखं!!

नोकरी कोतवालाची….परंतु काम एका समाजसेवकाचे,समाजसेवकासारखं!!

आमच्या गावातील माझ्या वर्ग मित्राचा गणपतरावांचं वाढदिवस…म्हणजे कौतुकाने गावकऱ्यांच्या (कलेक्टरांचा)गणपतराव तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!काल म्हणजे गुरुवारी गणरायांच्या निरोपाचा दिवस!! ह्याच दिवशी आमच्या गणपतरावांचा वाढदिवस!!!वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे गणपतरावांना आपल्या जन्मदिनाची आठवण झालीच नाही… किंबहुना कुटुंबाला सुद्धा वेळ देता आला नाही…कारण गावांमध्ये ढगफुटी झाली….सकाळी गणपतीच्या मिरवणुका ,त्यामुळे गणपतीच्या मिरवणुकीमध्ये गावात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून गणपतराव तीन वाजेपर्यंत कामात व्यस्त!!आणि तीन नंतर अतिवृष्टी मध्ये कोणाचे काय नुकसान झाले ,कुणाला काय त्रास झाला हे ऐकण्यामध्ये गणपतराव व्यस्त!!मला तर रात्री पावणेदहा वाजता गणपतरावांचा फोन आला…तहसीलदार येतायेत गावामध्ये पाहणी करायला!असा एक अफलातून माणूस……
खरं म्हणजे गणपतरावांच्या घराण्याला कोतवालाचा वारसा कारण त्यांचे चुलते गावचे कोतवाल !गणपतरावांची वडील जरी कोतवाल नसले तरी गावचं यात्रा, असो सप्ताह असो ही सगळी काम अत्यंत प्रामाणिकपणे करणारा माणूस. सुरुवातीच्या काळामध्ये गणपतरावांनी शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबईमध्ये नोकरी करण्याचा प्रयत्न केला…. परंतु तिथे ते तर स्थिरसावर झाले नाही!!मग गावाला आले भीमाशंकर कारखान्यामध्ये नोकरी करायचा प्रयत्न केला!तेथेही व्यवस्थित जमले नाही…मग कोतवालाची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले व गावामध्ये कोतवाल म्हणून काम करायला लागले. त्यांच्या दुर्भाग्यामुळे म्हणा किंवा नशिबामुळे गणपतरावांना व्यसन लागलं आणि त्या व्यसनातून ते मुक्त होतील असं कधी गावातील एकही माणसाला वाटलं नाही.परंतु पूर्वजांची पुण्याई व गणपतरावांचे काम यामुळे गणपतराव व्यसनापासून बाजूला झाले व आज गणपतराव धामणी शिरदाळे पहाडदरा प्रत्येक ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत बनलाय!!म्हणूनच मी म्हटले काम कोतवालाच परंतु जबाबदारी समाजसेवकाची….गावातील कोणत्याही शेतकऱ्याला अडचण आली सातबारा असो फेरफार असो तलाठ्याचा दाखला असो गणपतरावला सांगितलं की कसली अपेक्षा न ठेवता गणपतराव हे सगळं निर्विवादपणे निरपेक्षपणे करणार म्हणजे करणार….मग हे करत असताना कसलीही पैशाची अपेक्षा नाही.गावामध्ये सगळ्यात जास्त श्रावणबाळ संजय गांधी या योजना राबवण्यात गणपतरावांचा पुढाकार !!विधवापरितक्ता प्रौढ व्यक्तींना स्वतःच्या खर्चाने सगळी कागदपत्र काढून देणार!!!व त्यांचं काम मार्गी लावणार असा आमच्या गावचा लाडका कलेक्टर…अशा या गणपतरावांना तमाम ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा!… काल तहसीलदार आले पाहणी करायला, आणि गणपतरावांच्या वाढदिवसाच्या आठवण झाली आमच्या ग्रामस्थांना!!रात्री दहा वाजता वाढदिवसाच्या निमित्ताने गणपतरावला शुभेच्छा दिल्या त्याही आमच्या गणपतरावांचे साहेब म्हणजे तालुक्याचे तहसीलदार नागटिळक साहेब यांच्या हस्ते!परत एकदा गणपतराव तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा…….

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.