ढगफुटी सदृश्य पावसामुळे शिरदाळे(ता.आंबेगाव)येथील बटाटा पीक धोक्यात!!
आंबेगावच्या पूर्व भागातील डोंगर माथ्यावर शिरदाळे हे गाव वसलेले आहे, बटाट्याचा आगर म्हणून या गावची ओळख आहे. बटाटे हे येथील मुख्य पीक असून येथील शेतकरी संपूर्णपणे बटाटा या नगदी पिकावर अवलंबून आहे काल लोणी धामणी परिसरात अवकाळी सदृश्य पाऊस झाला त्याचा फटका या गावातील बटाटा या पिकाला बसला आहे, सध्या या परिसरात बटाटा काढणीला वेग आला आहे परंतु काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात ठिकठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे हे बटाटे आता शेतकऱ्यांना बैल आणि नांगरणीच्या साह्याने काढता येणार नाहीं ते बटाटे हाताने काढायला लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरीवर अधिकच्या खर्च करावा लागणार आहे त्याचप्रमाणे हे बटाटे अधिक दिवस साठवता येणार नाही कारण ते सडण्याची भित्ती निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी शासनाने त्वरित पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी बांधव करत आहे.