अरे व्वा…तहसीलदार असावेत तर असे!! आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार श्री.नागटिळक सर सलाम तुमच्या कर्तव्य तत्परतेला!!

तहसीलदार साहेब सलाम तुमच्या कर्तव्य तत्परतेला!!
काल दुपारी तीनच्या सुमारास धामणी परिसरामध्ये प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली. खरं म्हणजे संपूर्ण पावसाळा सात आठ गावांमध्ये कोरडा गेला. पहिले पीक हातातून गेलं! हातातून गेलं म्हणण्यापेक्षा पेरणी झाली नाही, ज्यांनी केली त्यांची पेरणी वाया गेली! धामणी आणि परिसरातील शेतकरी पावसाची प्रचंड वाट पाहत होता.यातच काल चांगला पाऊस झाला! दीड वर्षांनी ओढे नाले भरून वाहिले. शेतकरी राजा सुखाचा श्वास टाकता .परंतु हा पाऊस होत असताना ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले ,बांध फुटले ,घरांमध्ये थोडे थोडे पाणी गेलं ! शिरदाळे विज पडून एक गाई दगावली !हे सर्व सोशल मीडियाला आले. आल्यानंतर ही वार्ता तालुक्याचे तहसीलदार श्री. नागटिळक यांना कळाली. आणि तहसीलदार आठ साडेआठ वाजता घोडेगाव वरून निघाले. सध्याच्या जगामध्ये असे अधिकारी मिळणे कठीण!! वरून आदेश आले तर जागेवर निघणारे अधिकारी आपण खूप वेळा पाहिले! परंतु फक्त सोशल मीडियावर पाहिलेल्या बातमीचा आधार घेऊन मी ज्या तालुक्यांमध्ये काम करतो त्या तालुक्यामधील जनतेला आधार देण्याचे काम या कर्तव्य तत्पर तहसीलदारांनी केलं! रात्री दहा वाजता ग्रामपंचायत मध्ये येऊन मा.पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच रेश्माताई, बो-हाडे,उपसरपंच भाऊ करंजखेले,माजी सरपंच सागरजी जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे, माजी सरपंच अंकुशराव भूमकर,दगडू करंजखेले, रुपेश जाधव व इतर ग्रामस्थांशी चर्चा केली. गावामध्ये काही नुस्कान झाला असेल तर शासन आपल्याबरोबर आहे! काळजी करू नका असे आश्वासने दिले ! व रात्री दहा वाजता पाण्याने फुटलेल्या बांधावर तहसीलदार उभे राहिले !अशा तहसीलदारांना धामणीकर ग्रामस्थांचा सलाम…