आरोग्य व शिक्षणराजकीयसामाजिक

देहु-आळंदी- मरकळ- तूळापूर रस्ता (५४ कोटी २२ लक्ष) केंद्रीय मार्ग निधीतून पूर्णत्वास येणार!

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची आढळराव पाटील यांनी घेतली भेट!!

देहु-आळंदी- मरकळ- तूळापूर रस्ता (५४ कोटी २२ लक्ष) केंद्रीय मार्ग निधीतून पूर्णत्वास येणार!

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची आढळराव पाटील यांनी घेतली भेट!!

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड टोलनाका ते नाशिक फाटा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे-शिरुर-नगर महामार्ग, या प्रमुख महामार्गांचे विस्तारीकरण तातडीने करण्याची केली आग्रही मागणी!!

पुणे जिल्यातील प्रमुख महामार्गाचे प्रलंबित प्रकल्प हाती घेण्याबरोबरच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची शक्तीस्थळे असलेल्या वढू व तुळापूर मार्गावरील देहु-आळंदी- मरकळ- तूळापूर रस्ता मजबूतीकरणाच्या रु.५४ कोटी २२ लक्ष रकमेच्या प्रस्तावास केंद्रीय मार्ग निधीतून प्राधान्याने मंजूरी दिली जाईल असे आश्वासन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले आहे.शिरुर लोकसभा मतदार संघातील महत्वाचे महामार्ग प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची आढळराव पाटील यांनी भेट घेतली.

या भेटीत पुणे-नाशिक महामार्गावरील खेड टोलनाका ते नाशिक फाटा, पुणे-शिरुर-नगर महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या प्रमुख महामार्गाचे विस्तारीकरण करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे आढळराव पाटील यांनी नितीनजी गडकरी यांना सांगितले. तसेच येथील वाहतूक कोंडीचा वस्तूनिष्ठ अहवाल मांडून प्राधान्याने व गांभिर्याने ही कामे सुरु करण्यात यावी यासाठी आग्रही मागणी आढळराव पाटील यांनी केली. त्यास मा.नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर कामांचे डीपीआर तातडीने पूर्ण करण्यात येऊन ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निर्देश दिले. राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेबांची शिफारस होऊन हवेली व खेड तालुक्यातून जाणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकस्थळाला जोडणारा देहू-आळंदी-मरकळ-तुळापूर हा
रु.५४.२२ कोटी रकमेचा प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधीतून मंजूरीसाठी सादर झाला आहे. त्यास मंजुरीची मागणी आढळराव पाटील यांनी या भेटीत केली.

“शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या चिकाटीची व पाठपुराव्याची
मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर होऊन सुरक्षित व
सुखकर प्रवासासाठी येथील प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घेतली जातील” असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी यावेळी सांगून आश्वस्त केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.