आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

ब्रह्माकुमारी संस्थेद्वारा निर्मित द लाईट हा हिंदी चित्रपट समारंभपूर्वक प्रदर्शित!!

ब्रह्माकुमारी संस्थेद्वारा निर्मित द लाईट हा हिंदी चित्रपट समारंभपूर्वक प्रदर्शित!!

नाशिक-: ब्रह्माकुमारी संस्थेद्वारा निर्मित द लाईट, जर्नी विदीन हा चित्रपट दिनांक 12 मे 2024 रोजी कॉलेज रोड येथील मूवी मॅक्स द झोन या मल्टिप्लेक्स मधील तीन स्क्रीन वर तसेच नाशिक रोड येथील मुक्ता टॉकीज रेजिमेंटल प्लाझा येथे समारंभ पूर्वक दाखवण्यात आला. हा चित्रपट बघण्यासाठी नाशिक भरातून ब्रह्माकुमारी संस्थेचे साधक तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉलेज रोड येथील चित्रपटगृहामध्ये ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट दाखवण्यात आला. यात प्रमुख अतिथी म्हणून गावकरी चे भागवत उदावंत, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, प्रसिद्ध व्यावसायिक नंदलाल चांदवडकर, पत्रकार धनंजय बोडके, डॉक्टर माणिकराव आव्हाड इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले. ब्रह्माकुमारी वीणा दीदी, ब्रह्माकुमारी चांदा दीदी, ब्रह्मा कुमारी कावेरी दीदी आदी समर्पित भगिनींनी सुयोग्य नियोजन करून चित्रपट गृहाची तीनही स्क्रिन फुल करण्याची किमया केली.
नाशिक रोड- येथील मुक्ता टॉकीज रेजिमेंटल प्लाझा येथे ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली द लाईट चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित प्रमुख पाहुणे द बिजनेस बँक नाशिक रोड चे अध्यक्ष श्रीनिवास लोह्या, सिंधी समाज महिला अध्यक्षा कृत्तिका कलानी, योगा शिक्षक ब्रिजमोहन मुंदडा, वास्तू बिल्डकोन चे बिल्डर सुरेंद्र मोहबिया, नगरसेवक शैलेश ढगे, इंडियन रेल्वे इंस्टिट्यूट ऑफ़ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चे प्रोफेसर हरिराम भाई, दसक मनपा शाळा मुख्याध्यापक विठ्ठल नागरे, देवळाली कॅम्प सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी मीरा दीदी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नाशिक रोड मधील ब्रह्माकुमारी साधक व नागरिक उपस्थित होते.

चित्रपट बघून अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

कृतिका कलानी, सिंधी समाज महिला अध्यक्ष– द लाईट ब्रह्माकुमारी संस्था द्वारे निर्मित चित्रपट बघण्याचे सौभाग्य मिळाले. शांती आणि पवित्रता आजच्या जीवनात खूप आवश्यक आहे याची जाणीव हा चित्रपट बघून होते. ब्रह्माकुमारी संस्थेला विनंती आहे कि अशा प्रकारचे चित्रपट नेहमीच दाखवावावेत ज्या मुळे समाजात मूल्य जागृती होत राहील…

प्राध्यापक हरिराम भाई IRIEEN, यांनी सांगितले कि आज मदर डे व नर्स डे आहे. आई चे महत्व दर्शविणाऱ्या या दिवसांच्या पार्श्व भूमीवर आज हा चित्रपट दाखविला आहे. या चित्रपटात ब्रह्माकुमारी संस्थेचे साकार संस्थापक आई प्रमाणे प्रेम देणारे ब्रह्मा बाबा यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्यासात आला आहे. जो चांगला विचार मनात आला तो ब्रह्मा बाबा प्रमाणे दृढ केल्यास असा संकल्प अवश्य सिद्ध होतो असे हि त्यांनी स्पष्ट केले.

बिल्डर सुरेंद्र महोबिया : — हा चित्रपट बघितल्या नंतर जाणीव होते कि आत्म्याची शुद्धता किती आवश्यक आहे. बाबांचा संदेश समाजात सर्वत्र देण्यासाठी आपण कार्यरत व्हावे हे हि या चित्रपटातून स्पष्ट होते असे मनोगत मेहोबिया यांनी प्रस्तुत केले.

योगा शिक्षक बृजमोहन मुंदड़ा– या चित्रपटातून स्त्री पुरुष समानतेचा खूप चांगला संदेश मिळतो. शरीर स्वास्थ्य सोबत मनाचे सुद्धा स्वास्थ्य राखणे आवश्यक आहे, या साठी प्रत्येकाने राजयोग मेडिटेशन शिकणे अवश्य आहे असेही मुंदड़ा जी यांनी सांगितले.

मुक्त टॉकीज चे व्यवस्थापक उदय शिरसाट यांनी संगीतले की आमच्याकडे अनेक बुकिंग येत असतात मात्र ब्रह्माकुमारी संस्थेचा हा चित्रपट बुकिंग ला आल्यानंतर येथील सदस्यांचे व्यवस्थापन त्यांचे सहकार्याची भावना शांततेत चालणारे कार्य संयम या सर्व गोष्टी मनाला भावल्या. आमच्या टीम मध्ये सुद्धा याची चर्चा झाली की इतक्या बुकिंग मध्ये हे बुकिंग अतिशय वेगळी अनुभूती देणारी ठरली. भविष्यात ब्रह्माकुमारी संस्थेचे इतरही चित्रपट आम्ही दाखवण्यास उत्सुक राहू असे शिरसाठ यांनी नमूद केले.

चित्रपटात ब्रह्माकुमारी संस्थेचे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या 1936-37 च्या काळातील जीवनपटावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटातून ब्रह्माकुमारी सदस्य सुरुवातीच्या काळात किती हालअपेष्टातून मार्ग काढत आपले जीवन उज्वल बनवतात, समाजाच्या सर्व प्रकारच्या विरोध जुगारून तसेच कोर्टाची सुद्धा मर्जी जिंकून हे सदस्य समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात, 1950 च्या काळात भारत पाकिस्तान फाळणी नंतर संस्थेचे माउंट आबू येथे स्थलांतर झाल्यावर सुद्धा बेगरी पार्ट मध्ये कशाप्रकारे सदस्य हालअपेष्टा सहन करून आपला पुरुषार्थ करतात, याचे मूर्तिमंत चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे. या चित्रपटात ब्रह्मा बाबा यांच्या जीवनातील फक्त सुरुवातीचां काळ दर्शविण्यात आला आहे मात्र यानंतरही ब्रह्मा बाबा यांचे समग्र जीवन हे अनेक अनुभवांनी संपन्न असून यावर सुद्धा आगामी काळात प्रकाश टाकण्यात यावा असे मनोगत येथे चित्रपट बघण्यासाठी आलेल्या ब्रह्माकुमारी साधकांनी व्यक्त केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.