आरोग्य व शिक्षण

लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न!!

लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न!!

डॉ सुरेश राठोड
कोल्हापूर -कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना अडचणी येतातच, अडचणी आल्या की संघर्षाची प्रेरणा, जिद्द आणि जगण्याची ऊर्जा सुद्धा निर्माण होते. नव्या रूपात आलेल्या संकटाबरोबर बळही मिळते, त्यातून चांगले करण्याची प्रेरणा आणि संधी घेऊन ज्या ज्या व्यक्तीने स्वतःच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे ते पाहून प्रत्येक युवा पिढीला मी असाच घडणार असे वाटते तेच खरे कार्य आणि अशा कार्याचा सन्मान करणे ही काळाची गरज अशा शब्दात योग सदगुरू डॉ.कृष्णदेव गिरी यांनी पुरस्कार प्राप्त अनेक क्षेत्रातील व्यक्तींबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

भारतरत्न, पूर्व राष्ट्रपती, महान वैज्ञानिक मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम संशोधन केंद्र व सभागृह, औरंगाबाद येथे संपूर्ण भारत देशातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना अध्यक्ष डॉ.अर्चना मेडेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये कार्यकारी संपादक दै. रोखठोक चे डॉ सुरेश राठोड, प्रमुख पाहुणे योग सद्गुरु डॉ कृष्णदेव गिरी प्रमुख उपस्थिती अमित चौधरी, कमलेश सिंह, भूपेंद्रजी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ सुरेश राठोड म्हणाले, आज संपूर्ण भारत देशातील 10 राज्याच्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार औरंगाबाद येथील डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सभागृहात होत आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे. प्रत्येक पुरस्कार प्राप्त व्यक्तीने कलाम साहेबांच्या प्रमाणे देशाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींमध्ये हातभार लावायचा आहे. अशी अपेक्षा मला आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षित आहे.
यानंतर या कार्यक्रमात दहा राज्यातून आलेल्या 75 लोकांना सन्मान गौरव पुरस्कार करण्यात आला. त्यामध्ये अशोक क्राईम्स्पेक्टर यांच्या माध्यमातून डॉ. कुमारी अर्चना मेडेवार यांना इंटरनॅशनल डिटेक्टिव्ह पोस्ट देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला. त्यांना आय कार्ड समान पत्र देऊन गौरव करण्यात आला .

पुरस्कार प्राप्त प्रवक्त्या डॉ. शारदा ठोके, साक्षी गिरी, पत्रकार पुण्यनगरी जुमडे सर, पत्रकार राजाराम चौगुले चौगुले, प्रवीण किरार, अशोकराव, जया मॅडम, राधा मॅडम, ऐश्वर्या कवडे, अशोक क्राइम चे नूरखान, अलका डोंगरे, सुनील शेळके, अरुणा गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.