शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या अवसरी खुर्द, तालुका – आंबेगाव येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या अवसरी खुर्द, तालुका – आंबेगाव येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न !!
————————————————————————–
शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजना २५१५ अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील ग्रा.मा.५५ अवसरी खुर्द ते कामठेमळा रस्त्यासाठी ३० लक्ष रुपये, अभंग मळा – कवली मळा जोड रस्ता यासाठी १० लक्ष रुपये व अभंग मळा रस्ता सुधारणा करणे १० लक्ष असा एकूण ५० लक्ष रुपये निधी मंजूर केला होता. ह्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या व शिवसेना जिल्हाप्रमुख, मा.आमदार शरद दादा सोनवणे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, अवसरी खुर्द गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी खासदार असताना अनेक विकासकामे केली असून खासदार नसतानाही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपये निधी दिला आहे. पुढच्या काळात देखील कोट्यावधी रुपये निधीतून अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. विकासकामे होत असताना संबंधित ठेकेदार यांचेकडून चांगले काम करून घेण्यासाठी बांधकाम विभागातील अधिकारी व स्थानिक ग्रामस्थांनी विकासकामांच्या दर्जावर लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील याप्रसंगी त्यांनी केले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष अरुणराव गिरे, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, मा.पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, शिवसेना पुणे जिल्हा संघटक अजित चव्हाण, शिवसेना विभागप्रमुख मल्हारी अभंग, उद्योजक प्रशांत अभंग, रविंद्र वळसे पाटील, जगदीश अभंग, शिवसेना शहरप्रमुख प्रविण टेमकर प्रसाद अभंग, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष मेघश्याम भोर, शांताराम अभंग, उत्तम शिंदे, राजू अभंग, कैलास भोर, चैतन्य टेमकर, सिद्धेश अभंग, योगेश अभंग, स्वप्नील इंदोरे, अक्षय भोर, भीमाभाऊ शिंदे, पूजन अभंग, सोमनाथ अभंग, भरत अभंग, नवनाथ कराळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.