आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

शिरदाळे (ता. आंबेगाव)घाटात रस्त्याचे काम सुरु असताना रोलर 200 फूट दरीत कोसळला!!

सुदैवाने जीवितहानी टळली!!

रस्त्याचे काम चालू असताना रोलर २००फूट दरीत कोसळून अपघात.

शिरदाळे धामणी घाट रस्त्यात संरक्षण कठडे बांधण्याची ग्रामस्थांची आग्रही मागणी.

वृत्त संकलन – प्रतिक गोरडे

काल पासून शिरदाळे धामणी रस्त्याच्या कार्पेट कामाला सुरवात झाली. काम चालू असताना U आकाराच्या पहिल्या वळणावर रोलर खोल दरीत कोसळला. चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. आता रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे सुरू आहे . रस्ता चांगला झाल्यावर त्यावरून वाहनांची वर्दळ देखील वाढणार आहे आणि परिणामी घाट रस्त्यात अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालून त्वरित संरक्षण कठडे बसवावेत अशी आग्रही मागणी शिरदाळे सरपंच सौ.वंदना तांबे,मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,ग्रामपंचायत सदस्य बिपीन चौधरी,जयश्री तांबे आणि ग्रामस्थांनी केली आहे. या पूर्वी देखील बऱ्याच वेळा ही मागणी करण्यात आली परंतु त्याला कायम केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यावेळी मात्र तसे झाले तर संपूर्ण ग्रामस्थांसह आंदोलन करण्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले. याअगोदर देखील अनेक छोटे मोठे अपघात या घाटात झाले आहे परंतु वारंवार याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळेतील मुलांची ये जा तसेच राजगुरूनगर ,चाकण परिसरात नोकरीसाठी जाणारे बरेच लोक या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे भविष्यात देखील या रस्त्यावर वर्दळ राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण घाट रस्त्यावर संरक्षण कठडे बसवावेत अशी अग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

गेली अनेक वर्षांपासून संपूर्ण घाट रस्त्यावर कठडे बसवन्याची मागणी होत असते परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एखादा मोठा अपघात झाल्यावर संबधीत विभाग जागा होणार आहे का? रात्रीच्यावेळी देखील या रस्त्यावर वाहने येत जात असताना त्यामुळे L आणि U आकाराची बरीच वळणे रस्त्यावर आहेत. त्या ठिकाणी मजबूत सिमेंट संरक्षण कठडे व्हावेत अशी आमची आग्रही मागणी आहे. ते जर झाले नाही तर प्रवासी ,ग्रामस्थ आणि विद्यार्थी मिळून मोठं आंदोलन केले जाईल असा इशारा श्री.मयुर सरडे उपसरपंच शिरदाळे यांनी दिला आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.