आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

केरळच्या हेमराज एम. के. या तरुणाने शिवरायांच्या प्रेमाने प्रेरित होऊन सायकलवर 18 महिन्यात 280 गडकोट केले सर…!!

केरळच्या हेमराज एम. के. या तरुणाने शिवरायांच्या प्रेमाने प्रेरित होऊन सायकलवर 18 महिन्यात 280 गडकोट केले सर…!!

हेमराज एम .के .हा तरुण केरळच्या कालीकट शहरातला आहे. त्याने वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आहे .पुढे काही काळ सौदी अरेबिया व दुबई येथे नोकरी देखील केली. नंतर त्याच्या जीवनात छत्रपती शिवरायांचा इतिहास आला व त्याने त्यातून प्रेरणा घेतली महाराष्ट्रात 1मे 2022 रोजी त्याने सायकलवर प्रयाण केले, 22 मे 22 रोजी महाराष्ट्रात प्रतापगड गाठला. तत्पूर्वी त्याने महाराष्ट्रातील शिवरायांच्या अनेक गड कोटांची यु ट्युब वर माहिती मिळवली. संकल्प करून महाराजांचे सर्वचे सर्व गडकोट सर करण्याची योजना आखली .
गेली 18 महिन्यात त्याने 280 गड सर केले. ह्या प्रवासात त्याने छत्रपती संभाजी महाराज – कोल्हापूर तसेच साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांचीही भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद संपादन केले. या प्रवासात त्याला अनेक दुर्गप्रेमी व गडकोट संवर्धन करणाऱ्या संस्थांनी सहकार्य केले. 8 ऑगस्ट 2023 रोजी नाशिकच्या गरुड झेप प्रतिष्ठान त्याचा सन्मान केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांनी त्याचे कौतुक करत त्याचा गौरव केला .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.