आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जारकरवाडी (ता. आंबेगाव) च्या हद्दीत मृत अवस्थेत आढळून आले बिबट्याचे पिल्लु!!

जारकरवाडी (ता. आंबेगाव) च्या हद्दीत मृत अवस्थेत आढळून आले बिबट्याचे पिल्लु!!

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावाच्या हद्दीत 6 महिनाच्या वयाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे.जारकरवाडी गावातील प्रगतशील शेतकरी श्री.विशाल चंद्रकांत कापडी यांनी याबाबत वन विभागाला कळवले.

जारकरवाडी परिसरात डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची चारी आहे. या चारीत बिबट्या मृत अवस्थेत आज सकाळी 11.00 वाजता विशाल कापडी व ग्रामस्थांना दिसून आला.

या परिसरात डिंभे धरणाचे पाणी फिरले असल्याने मोठया प्रमाणावर दडन तयार झाली आहे.कोल्हा, लांडगे, मोर, ससे आदी वन्य प्राण्यांची मूलभूत गरज भागात असल्याने मोठया प्रमाणात त्यांचे वास्तव्य आहे.

या परिसरात उसाचे क्षेत्र ही मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या ही जास्त आहे.

या वेळी वनपाल गिते यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.