वीज पंपाच्या केबल चोऱ्या इथल्या संपत नाही!! काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे घोड नदीच्या काठावर असणा-या वीज पंपांच्या पाच केबलची पुन्हा एकदा चोरी!!शेतकरी वर्ग आला मेटाकुटीला!!

वीज पंपाच्या केबल चोऱ्या इथल्या संपत नाही!!
काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे घोड नदीच्या काठावर असणा-या वीज पंपांच्या पाच केबलची पुन्हा एकदा चोरी!!शेतकरी वर्ग आला मेटाकुटीला!!
आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या घोडनदी मुळे आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे बारमाही बागायती झाली आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये वीज पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पाणी शेतापर्यंत नेले असून त्यावर आपली शेती फुलवली आहे. नदीकाठच्या गावांना सध्या विज पंपांच्या केबल चोरीचा शाप लागला असून नदिकाठच्या गावांमध्ये वारंवार वीज पंपांच्या केबल चोरी होत आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वैतागला असून केबल चोरी रोखायची कशी? हा प्रश्न शेतकऱ्यांपुडे पडला आहे. वारंवार केबल चोरी होत असूनही केबल चोर सापडत नाहीत त्यामुळे शेतकरी नाराज आहे.
काठापूर बुद्रुक येथील नदीकाठी 80 ते 85 विद्युत पंप आहेत या विद्युत पंपांच्या साह्याने येथील शेतकऱ्यांनी पाणी उपसा करून काठापुर,लाखनगाव, पोंदेवाडी परिसरातील शेती बागायती केली आहे. पण सातत्याने केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. बुधवारी रात्रीच्या वेळी केबल चोरांनी निवृत्ती बाबुराव करंडे,अशोक आनंथा जोरी,सखाराम दिनकर ढमाले,बबनराव वाळुंज,अमोल वाळुंज,दत्ता कारभारी वाळूंज,महेंद्र पोखरकर या पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी केली. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास दहा हजाराचे असे एकुण 50 हजार रुपयाचे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
महिन्यातून एक वेळा केबल चोरी होत असल्याने ही केबल चोरी थांबवायची कशी? हा प्रश्न शेतकऱ्यां समोर आहे.याबाबत पोलीस प्रशासनाने लक्ष घालून केबल चोरांना आळा घातला पाहिजे ती मागणी होत आहे.