आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गावला गावपण देणारी माणसं…..!!

साभार लेख - संदीप तांबे,शिरदाळे ता.आंबेगाव,जि. पुणे

गावला गावपण देणारी माणसं..

मित्रांनो, जेव्हा नोव्हेंबर अर्थात आश्विन मराठी महिन्याच आगमन होत तेव्हा आपल्या सगळ्यांना चाहूल लागते ती गुलाबी थंडीची त्याचप्रमाणे दिवाळी या सणाची आपण या दिवसांची खूप आतुरतेने वाट पाहत असतो कारण या दिवसांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे नोकरी व्यावसायिकांना सुट्टी असते. या सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकमेकांना भेटत असतो स्वत ला कपडे त्याचप्रमाणे एखादी नवीन घरगुती वस्तू गाडी खरेदी करत असतो, प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. परंतु त्याचप्रमाणे या मराठी महिन्याला अजून एका दृष्टीने खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे अस मला वाटते, कारण या महिन्यात प्रत्येक गावात ग्रामदैवत असणाऱ्या मंदिरामध्ये काकड आरतीला सुरूवात होते भल्या पहाटे ४:३० वाजता गावातील मंडळी मंदिरात एकत्र येऊन काकड आरतीला सुरूवात करतात. आमच्या शिरदाळे सारख्या छोट्याशा गावात श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ शिरदाळे त्याचप्रमाणे काही ज्येष्ठ पुरुष आणि महिलांमुळे ही परंपरा अखंड चालू आहे, सकाळच्या वेळेत ज्यावेळेस हे अभंग कानावर पडत असतात तेव्हा एक वेगळाच अनुभव आणि आनंद अनुभवयाला मिळतो. माणसाच्या मनाला टवटवीत आणि प्रफुल्लित करण्याच काम या गोष्टी करत असतात. परंतु भविष्यात अशा प्रथा आणि परंपरा जिवंत ठेवणारी ही शेवटचीच पिढी असेल!!
राम कृष्ण हरी

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.