सामाजिक

श्री मंगेश येवले सर यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती ; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय !

img 20261122 wa0445
1011780325

पंचनामा प्रतिनिधी – श्री हनुमान शिक्षण संस्था संचलित श्री हनुमान विद्यालय, गंगापूर बुद्रुक येथे श्री. मंगेश गोविंद येवले सर यांनी दिनांक 1 नोव्हेंबर 2026 पासून मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

श्री. येवले सर यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटविला आहे. माजी विद्यार्थी संघटन मजबूत करणे, विविध सहशालेय उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे, यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.

तसेच प्राथमिक शाळा गंगापूर बुद्रुक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत असून, माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचे कार्य ते करीत आहेत.

1011769301

गंगापूर बुद्रुक येथील वैकुंठधाम सुशोभीकरणाच्या कामातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. शैक्षणिक कार्यासोबतच गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक विकासासाठी त्यांची असलेली तळमळ विशेष उल्लेखनीय आहे.

त्यांच्या शैक्षणिक अनुभवाचा, संघटन कौशल्याचा व सामाजिक कार्याचा विद्यालयाच्या प्रगतीस निश्चितच लाभ होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता उंचावेल आणि विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

श्री मंगेश येवले सर यांच्या मुख्याध्यापकपदी नियुक्तीबद्दल श्री हनुमान शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक व समस्त ग्रामस्थ गंगापूर बुद्रुक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

1011769271

Related posts

जीवन प्रवासात “भाग्य” हे लिप्ट सारख आहे तर “मेहनत” ही शीडी सारखी आहे..!!

Chief Editor

वडगावपीर येथे श्री बोल्हाई माता ९ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होणार

Chief Editor

स्तंभलेखक संजय नलावडे लिखित ग्रंथाली प्रकाशित ‘शिवनेरीचे वैभव’ या पुस्तकाची ऑनलाईन नोंदणी सुरू.’

Chief Editor

Leave a Comment