सामाजिक

समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंतांचा दिमाखदार गौरव सोहळा संपन्न;आवडीनुसार क्षेत्र निवडा; जीवनात यशस्वीता नक्कीच मिळेल– प्रा.राजीव सावंत

img 20260714 wa0517
img 20260714 wa0504

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हे येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साह, आनंद आणि प्रेरणेच्या वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान होताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले, तर पालकांच्या चेहऱ्यावर आपल्या पाल्यांच्या यशाचा अभिमान स्पष्टपणे झळकत होता.

यावेळी बारावी विज्ञान शाखेत वैष्णवी येवले हिने प्रथम, रिद्धी थिटे हिने द्वितीय, तर श्रुती शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बारावी वाणिज्य शाखेत फातिमा इकरा हिने प्रथम, साई काळे याने द्वितीय आणि दर्शन गाडगे याने तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत मानाचा तुरा खोवला.

याशिवाय एमएचटी-सीईटी (PCM), एमएचटी-सीईटी (PCB) तसेच एमएचटी-सीईटी नर्सिंग या गटांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना उपस्थित पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात त्यांच्या यशाचे कौतुक केले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत म्हणाले, “विद्यार्थ्यांनी इतरांचे अंधानुकरण न करता स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्य ओळखून करिअरचे क्षेत्र निवडावे. आवडीनुसार निवडलेल्या क्षेत्रात यश निश्चित मिळते. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीचा समन्वय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा भक्कम पाया ठरतो. शिस्त, सातत्यपूर्ण परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही ध्येय सहज गाठता येते.”
कार्यक्रमादरम्यान अनेक पालकांनी समर्थ शैक्षणिक संकुलातील उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, नियोजनबद्ध अध्यापन, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, आधुनिक सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे मुक्तकंठाने कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या गौरव सोहळ्याचे नियोजन प्रा. संतोष पोटे, प्रा. राजेंद्र नवले, प्रा.रोहिणी औटी, प्रा.नूतन पोखरकर, प्रा.अमोल खामकर आणि प्रा.संगीता रिठे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व नेटकेपणाने केले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक एच.पी नरसुडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, शिक्षक, पालक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

1009850407

Related posts

राजर्षी शाहू-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचा विचारच भारताला दिशा देणारा” — खासदार प्रा. डॉ.ज्योतीताई वाघमारे

Chief Editor

“टायगर अभी जिंदा है…” : शिरूरच्या राजकारणातील पुनरागमनाची चाहूल !!

Chief Editor

धामणीच्या खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवणारा किमयागार किशोर बापू विधाटे !!

Chief Editor

Leave a Comment