आरोग्य व शिक्षणराजकीय

धामणी(ता.आंबेगाव) येथे पोस्ट ऑफिस मध्ये नविन खाते उघडण्यासाठी कॅम्प आयोजित करावा- मा.सरपंच सागर जाधव

धामणी पोस्ट ऑफिस मध्ये नविन खाते उघडण्यासाठी कॅम्प आयोजित करावा- मा. सरपंच सागर जाधव

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील महत्त्वाचे गाव असणाऱ्या धामणी गावातील पोस्ट ऑफिस मध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान या योजनेचे वार्षिक येणारे अनुदान ज्यांचे बंद झाले आहे त्यांना शासनाच्या नियमानुसार पोस्ट ऑफीसमध्ये नविन खाते उघडायला सांगितले आहे.त्या संदर्भात धामणी डाकघर चे पोस्टमास्तर श्री. योगेश सांगडे यांना कॅम्प आयोजित करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
धामणी, पहाडदरा, शिरदाळे, खडकवाडी व ज्ञानेश्वरवस्ती यांना बाहेर गावी जावे लागत आहे तरी या गावांतील शेतकऱ्यांना नविन खाते उघडण्यासाठी बाहेर गावी न जाता धामणी गावात पोस्ट च्या वतीने कॅम्प आयोजित करावा जेणेकरून वृद्ध,शेतकरी महिलांना गावातच खाते उघडता येईल.
त्याप्रसंगी उपसरपंच संतोष करंजखेले, मा. सरपंच सागर जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नितीन जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे, पोस्टमन सुधाकर जाधव , अमोल जाधव , ऋषिकेश घोलप , संजय दहीवाळ , सिताराम वायकर , प्रकाश कासार , नबाब नायकोडी , राहुल गरुड उपस्थित होते .

“ग्रामीण भागातील शेतकरी, महिला यांना धामणी डाकघराचा नेहमीच फायदा होत असतो. परंतु शासनाच्या नविन नियमानुसार पीएम किसान योजनेचे वार्षिक ६००० रुपये अनुदान जमा होण्यासाठी शासनाने काही शेतकऱ्यांना पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल खाते उघडुन तो खाते नंबर पीएम किसान योजनेला जोडायला सांगितला आहे.अशा तब्बल १२० शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे प्राप्त झाली आहे. तरी पोस्ट ऑफिस ने लवकरात लवकर नविन खाते उघडण्यासाठी कॅम्प आयोजित करुन वृद्ध व महिला शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीही जाधव यांनी केली होती.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.