आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी(लोणी) गावचे सुपुत्र कै. ज्ञानेश्वर मारुती डोके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी(लोणी) गावचे सुपुत्र कै. ज्ञानेश्वर मारुती डोके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी(लोणी) गावचे सुपुत्र कै. ज्ञानेश्वर मारुती डोके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.डहाणूकर महाविद्यालय (मुंबई ) येथे प्राचार्य पदावर ते सेवेत होते.

डॉ.ज्ञानेश्वर मारुती डोके यांचे प्राथमिक शिक्षण खडकवाडी येथे तर शालेय शिक्षण शिवाजी विद्यालय धामणी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले . प्राध्यापक म्हणून डहाणूकर महाविद्यालय मुंबई येथे आणि तेथेच प्राचार्य म्हणून नियुक्त झाले . तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून नियुक्त झाले होते.

माजी विद्यार्थी संघटना धामणी यांचे माध्यमातून गुरुवर्य प्रा.के. एस. कर्णे सर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारा ‘केशवाय नम: ‘ नावाचा स्मृतिग्रंथ दोन वर्षापूर्वी प्रकाशित करण्यात आला ; त्याचे प्रमुख संपादक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर डोके यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
डॉ. ज्ञानेश्वर डोके सरांचे असे अचानक जाणे मनाला चटका लावणारे ठरले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.