आरोग्य व शिक्षणसामाजिक

राजगुरुनगर – शिरदाळे – धामणी – लोणी बससेवा सोमवार २३ जून २०२५ पासून पुन्हा सुरू होणार !!

राजगुरुनगर – शिरदाळे – धामणी – लोणी बससेवा सोमवार २३ जून पासून पुन्हा सुरू होणार !!

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी -आंबेगाव पूर्व भागातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.काही दिवसांपासून बंद असलेली राजगुरुनगर-शिरदाळे-धामणी-लोणी बससेवा सोमवार, २३ जून २०२५ पासून पुन्हा सुरू होणार आहे.यामुळे लोणी येथील विद्यालय आणि धामणी येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची तसेच परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची होणारी गैरसोय टळणार आहे.

लोणी हे व्यापारदृष्ट्या एक मोठी बाजारपेठ असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करतात.बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यायी साधनांवर अवलंबून राहावे लागत होते.ही बाब लक्षात घेऊन आंबेगाव तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.

या पाठपुराव्यादरम्यान जिल्हा परिषदेचे मा.उपाध्याक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मागदर्शनखाली आंबेगाव तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज निघोट यांनी राजगुरुनगर येथील आगारप्रमुख श्रीमती टाकळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.या चर्चेनंतर श्रीमती टाकळकर यांनी २३ जून २०२५ पासून सायंकाळी ४ वाजता राजगुरुनगर-शिरदाळे-धामणी-लोणी मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरू होईल असे आश्वासन दिले.

यावेळी शिवराज निघोट यांच्यासोबत अवधूत थोरात,शुभम थोरात,सोहम चौधरी आणि लोणी विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.