पारगाव (ता.आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवले गतिरोधक!!

पारगाव (ता.आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवले गतिरोधक!!
पारगाव (ता.आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतिरोधक बसवण्यात आले आहेत. यामुळे ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी समाधान व्यक्त केले आहे.
गतिरोधक बसवण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. गतिरोधक बसवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करून गतिरोधक बसवण्याची संबंधित विभागाकडे आग्रही मागणी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
यावेळी पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे ,ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे,काळुराम लोखंडे, विठ्ठल ढोबळे, अंकिता लोखंडे,बजरंग देवडे, सागर लोखंडे, स्वप्निल लोखंडे, साहेबराव शिंदे, रोडेमामा,विलास पडघमकर, संजय देठे व ग्रामस्थ उपस्थित होते.