ह.भ.प.दत्तात्रय(अण्णा) नाथाजी देवडे यांचे दुःखद निधन!

ह.भ.प.दत्तात्रय(अण्णा) नाथाजी देवडे यांचे दुःखद निधन!!
पुणे जिल्हा नाभिक समाजाचे नेते,मुक्तादेवी पायी दिंडी सोहळा समितीचे विश्वस्त,सामाजिक,धार्मिक क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे कैलासवासी ह.भ.प.दत्तात्रय(अण्णा) नाथाजी देवडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,तीन मुली,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक कार्याची आवड असणारे, नेहमी लोकांच्या सुख- दुःखात नेहमी सहभागी होणारे,लोकांची अडचण सोडवणारे असे सर्वार्थाने समृद्ध नेत्रुत्व हरपल्याची भावना पंचक्रोशीत व्यक्त होत आहे.
त्यांच्या जाण्याने देवडे परिवारावर भावनात्मक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ग्रामपंचायत सदस्य ते नाभिक समाजाचे अध्यक्ष असा त्यांचा जीवनपट राहिला.त्यांच्या जाण्याने पारगाव ग्रामस्थांमध्ये सामाजिक, धार्मिक,राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.