साकोरेमळा शाळेत नवोदय पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार पारगाव (शिंगवे) चे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल वाव्हळ यांच्या हस्ते संपन्न !!

साकोरेमळा शाळेत नवोदय पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार पारगाव (शिंगवे) चे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल वाव्हळ यांच्या हस्ते संपन्न !!
साकोरेमळा शाळेत नवोदय पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार पारगाव (शिंगवे) चे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल वाव्हळ यांच्या हस्ते ,उपस्थित पालकांच्या वतीने संपन्न करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे मळा(शिंगवे)तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील चार विद्यार्थी केंद्रीय नवोदय विद्यालय निवड पात्र ठरलेले असून त्याच बरोबर एक विद्यार्थिनी ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाल्याच्या निमित्ताने पालक, ग्रामस्थ यांच्यावतीने विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नवोदय निवडपात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे
1)साईराज सचिन वाव्हळ
2)स्वरांजली भाऊ वाव्हळ
3)मानसी नितेश काटे
4)समर्थ सचिन लाडके
5)शुभ्रा संतोष आचार्य (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला निवड)
मागील पाच वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी करत १५ विद्यार्थी नवोदय निवड परीक्षेमध्ये निवड पात्र झाले असून,ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत दोन विद्यार्थी निवड झालेले आहे.तसेच ५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये निवड झालेली असल्याचे मुख्याध्यापक बाबाजी गाढवे सर यांनी सांगितले.
शाळेचा पट मागील पाच वर्षात ४५ वरून १६८ पर्यंत पोहोचला आहे. शाळेत ४० किलोमीटर परिसरातून अनेक गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत व शाळेचे प्रवेश हाउसफुल झाले असून विद्यार्थी वेटिंग लिस्ट वर आहेत.
शाळेचा नवलौकिक सर्वदूर पसरवल्याबद्दल व नवोदय परीक्षा यशाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक बाबाजी गाढवे,सहशिक्षक नितीन शेजवळ,मार्गदर्शक अभिजीत नाटे,आरती डोंगरे,संगीता वाव्हळ, यांचा सत्कार माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल वाव्हळ,सदस्य दिगंबर वाव्हळ,जालिंदर आरोटे,निलेश वाव्हळ,रेश्मा वाव्हळ,समीर वाव्हळ,सोमेश्वर दीक्षित,बाळासाहेब मेहेत्रे,पंकज वाळूंज, संदिप निकम,मनोज ढोबळे,अजित औटी,कल्पेश वाघ, हनुमंत बोर्हाडे,यांसह ग्रामस्थ व पालक बहू संख्येने उपस्थित होते.