संत समाजाला दिशा देण्याचे काम करतात -वेदाचार्य विशालशास्री हाडवळे

संत समाजाला दिशा देण्याचे काम करतात -वेदाचार्य विशालशास्री हाडवळे
संत समाजाला दिशा देण्याचे काम करतात.संत संगतीत राहून ईश्वराची प्राप्ती तर होतेच शिवाय देवाचे देवत्वही कळते.संत कृपेने गवतालादेखील ब्रम्हरुपाची किंमत येत असते.रंजलेल्या ,गांजलेल्यात व संताच्या संगतीत देव शोधण्याचा प्रयत्न करा,संत- संगतीत राहून मनुष्य जीवांचा उध्दार करा.काळाची गरज ओळखून राष्ट्राच्या हिताकरिता सर्वानी आपले अंत:करण विशाल करा. गावागावात सर्वांनी धार्मिकता,सामाजिकता,एकता संभाळण्याचा प्रयत्न करा, गावागावात नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा गावातील पुरातन मंदिराचा जिर्णोध्दार करुन त्यांची दैनदिन व्यवस्था ठेवा असे आवाहन वेदाचार्य विशालशास्री हाडवळे यांनी केले.
धामणी (ता.आंबेगाव) येथील बोल्हाईच्या माळावरील पुरातन ग्रामदेवता बोल्हाई मंदिराच्या जिर्णोध्दार करण्यात आलेल्या बोल्हाईच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहन श्री हाडवळे व जेष्ठ किर्तनकार,वारकरी व माळकर्याच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
बोल्हाई मूर्तीची व कलशाची आणि मांडवडहाळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत भक्तिवेदान्त वारकरी शिक्षण संस्था व संत एकनाथ महाराज गुरुकुल खंडाळे,रांजणगांव गणपती येथील संतोष महाराज खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली या गुरुकुलचे ४० शिक्षार्थी वारकरी टाळ मृदुंगासह याशिवाय समस्त पंचरास मंडळीचा ताफा पारंपारिक वाद्यासह सामील झालेले होते.त्यानंतर बोल्हाईचे धान्यवास सोहळा,श्री गणेश पुण्याहवाचन शुभारंभ मूर्ती स्थापन विधी,देवतापूजन विधी,अग्निस्थापना होमहवन विधी,पर्यापी हवन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन व पूर्णाहूती विधी व आरती करण्यात आली.
परमार्थाचा वारसा संतानी आपल्याला दिलेला आहे तो वारसा जतन करण्यासाठी व परंपरा कायम ठेवण्यासाठी वारकरी सांप्रदायाने मोठे कार्य केलेले आहे.ज्ञानेश्वरी व गाथा सारख्या अनमोल ग्रंथाचे जीवनात पारायण केल्याने मनुष्याला ज्ञान,वैराग्य व भक्तीची प्राप्ती होते. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात संतानी निर्मित केलेल्या ग्रंथाचे वाचन करावे.जगाच्या कल्याणासाठी संत हे भूतलावर जन्म घेतात व मानव जातीचा उध्दार करतात,संताचे विचार हे समाजाला दिशा देणारे असल्याने संत संगतीत राहून परमार्थ करा असा संदेश हाडवळे महाराज यांनी यावेळी दिला.
धामणी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गावांतील सर्व पुरातन मंदिरांचा जिर्णोध्दार करुन समाजापुढे चांगला आदर्श ठेवलेला आहे.येथील पुरातन म्हाळसाकांत खंडोबा मंदिर आणि परिसर हा प्रेक्षणीय झालेला असून हे देवस्थान महाराष्ट्रातील जागृत व प्रेक्षणीय स्थान म्हणून लौकीक पात्र असल्याचा गौरव हाडवळे यांनी यावेळी केला.
यावेळी ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे,शरद बँकेचे मा.चेअरमन आण्णा पाटील जाधव,पहाडदर्याचे सरपंच मच्छिंद्र वाघ,उपसरपंच कैलास वाघ, मा.सरपंच सागर जाधव,दादाभाऊ भगत,नितीन गवंडी,संदीप आळेकर,विठ्ठल बढेकर,शामराव करंजखेले,सुभाष तांबे,श्रीकांत विधाटे,पांडुरंग महाराज बोर्हाडे,राजेश भगत,गणेश पंचरास,शांताराम पंचरास,दिलीप आळेकर,गोरक्षनाथ आमाप,मिलींद शेळके,निलेश करंजखेले,कांताराम तांबे,सुरेश बढेकर,सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब लालजी बढेकर,बाळासाहेब महादू बढेकर,अरुण विधाटे,रमेश जाधव,मच्छिद्र रोकडे,दिनकर रोकडे,प्रकाश पाटील जाधव,गोरक्षनाथ कडवे,दगडूभाऊ करंजखेले,उत्तम जाधव,वामनराव जाधव,बाळासाहेब जाधव,मुरलीधर देखणे व ग्रामस्थ आणि महिला भाविक उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदाचार्य मंदारशास्री क्षिरसागर व प्रमोदकाका देखणे आणि त्यांच्या सहकार्यानी केले.श्री अंबिका भजनी मंडळ पहाडदरा व ढोबळेवाडी जारकरवाडी येथील श्री वडजाई संगित भजनी मंडळ यांचा भजनाचा व दिनेश जाधव यांचा बोल्हाईच्या भक्तिमय गीतांचा देवी जागर करण्यात आला.बोल्हाई मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी योगदान देणार्या देणगीदारांचा ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
भाविकांना भागवत एकादशीच्या निमित्ताने खिचडी व केळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.