आत्मा मालिक इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्डद्वारा जनजागृती कार्यक्रम!!

आत्मा मालिक इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्डद्वारा जनजागृती कार्यक्रम!!
शहापूर -मोहिली – अघईत आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (अभियांत्रिकी महाविद्याललयात)
भारतीय प्रतिभूती और विनिमय बोर्ड स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला.”आर्थिक साक्षरता ” या विषयावर तज्ज्ञ मार्फत बजेट तयार करणे, बचत करणे, गुंतवणूक करणे आणि आर्थिक व्यवस्थापन तसेच विविध विषयावर चर्चा सत्त्राचे आयोजन करण्यात आले.यावेळी सी.ए. प्रसन्न पंगम, पल्सुले पंगम अँड कंपनी यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाबद्दल संस्थेचे परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपाशीर्वादाने समस्त संत परिवाराच्या प्रेरनेतून,अध्यक्ष नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व विश्वस्त मंडळ, संकुलाचे कार्यध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, डॉ. डी. डी. शिंदे, उपप्राचार्य प्रा. गोविंद चव्हाण, पदविका प्रमुख सूर्यकांत नवले,कार्यक्रम समन्वयक प्रा. ओंकार सांबरे,प्रा. नेहा सासे यांनी अथक परिश्रम घेतले.