लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा!!

लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी (धामणी) येथे श्री विश्वकर्मा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्री विश्वकर्मा प्रभूंची यांच्या मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.मिरवणुकीमध्ये लोणी ग्रामस्थ, व समाज बांधव महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
दुपारी ह.भ. प.धनश्रीताई चौधरी यांची किर्तन सेवा पार पडली.तसेच सायंकाळी सौ.गायत्रीताई शेलार प्रसिद्ध गायिका यांच्या भक्तीसंगीत भजननाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन केले गेले.
श्री.विश्वकर्मा मंदिराचे वरील मजल्याचे पत्रा शेडचेसाठी सौजन्य माननीय श्री सचिन रोकडे (उद्योजक) देहूरोड यांनी दिले व पहिल्या मजल्यावर जाण्याकरिता लोखंडी जिन्याचे सौजन्य मा. श्री.चेतन सुभाष लोखंडे (निरंकार आर्ट्स पुणे ) यांच्या माध्यमातून लोकअर्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरिता श्री दत्त गौरीशंकर विश्वकर्मा मंदिर मंडळ ट्रस्ट मधील सर्व कार्यकारी मंडळ व सभासद तसेच सर्व ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.