आरोग्य व शिक्षणसामाजिक

भक्तीला शक्तीची जोड मिळाल्यास समाजाची प्रगती निश्चित- ह.भ.प.सिनलकर महाराज

भक्तीला शक्तीची जोड मिळाल्यास समाजाची प्रगती निश्चित- ह.भ.प.सिनलकर महाराज

भक्ती हा सेवेचा पाया आहे पण त्या भक्तीला शक्तीची जोड देण्याची आवश्यकता आहे “शक्तिविना भक्ती निष्क्रीय आणि भक्तिविना शक्ती विनाशक “‘ हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आपल्या संत महंतानी आपल्याला भक्तीची शिकवण दिली पण त्यासोबतच शक्तिचे महत्व देखील पटवून दिलेले आहे त्या संताच्या विचारांचे पाईक होणे ही काळाची गरज आहे.

आध्यात्मिक आणि भौतीक शक्तीची सांगड घालून त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तरच आपल्याला सुख समाधान आणि शांती मिळेल त्यासाठी शास्राचा आधार घेणे आवश्यक आहे असे विचार जेष्ठ किर्तनकार बबनराव महाराज सिनलकर(लोणी) यांनी व्यक्त केले.धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात (सोमवारी) दोन्ही महाद्बाराच्या मध्ये ओट्यावर बसविण्यात आलेल्या “भक्ती शक्तीचे प्रतिक जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी शिल्प अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथील भाविक ह.भ. प. गोविंदराव शंकरराव देशमुख व त्यांच्या कुटुंबियानी भक्ती शक्तीचे हे संगमरवरी शिल्प धामणीच्या खंडोबा देवस्थानास अर्पण केले आहे.धामणी येथील खंडोबा देवस्थानाचे महात्म्य खूप मोठे असून पुणे,नगर,नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे हे देवस्थान कुलदैवत आहे. लोकवर्गणीतून मंदिराचा व परिसराचा चेहरामोहरा बदललेला असून पंचक्रोशीतील जागृत व प्रेक्षणीय तिर्थक्षेत्र म्हणून हे खंडोबाचे देवस्थान प्रसिध्द झालेले आहे.येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पुरातन मंदिर जपलेले आहे.सर्व जातीधर्मातील लोकाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्रीकरण केले तर सर्वाना समान वाटपसुध्दा केले.

आदर्श राज्यपध्दती आणि जीव—शिव ऐक्याची शिकवणूक आपल्या कृतीतून मांडली गेली.जो गुरुचा झाला त्याला अधिष्ठान प्राप्त होते. त्यामुळे छत्रपती “रयतेचे राजे” म्हणून चिरंतन स्मरणात राहीले असे सिनलकर महाराज यांनी यावेळी सांगितले.

जीवनात केलेल्या तिर्थयात्राच्या शाहीस्नानाने व केलेल्या संत्सगाने दानधर्माने व पुरातन देवस्थानाच्या जिर्णोध्दाराने मानसिक दोषांची मुक्ती होते.त्यामुळे सर्वानी त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. सुखसमाधानाकरिता संत विचाराने जगण्याचा प्रयत्न करा.मलिन झालेले तिर्थ संताच्या पदस्पर्शाने पुनीत होते. तिर्थक्षेत्र आपल्याला पवित्र करतात.असे ह.भ. प. तान्हाजी महाराज तांबे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी देणगीदार देशमुख कुटुंबियाचा देवस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सौ रेश्मा बोर्‍हाडे,मा. सरपंच सागर जाधव,किसनमहाराज तांबे,दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,धोंडीबा भगत,प्रकाश पाटील,प्रभाकर भगत,बाळासाहेब सिताराम विधाटे,राजाराम विधाटे,अरुणशेठ विधाटे,संदीपराव भुमकर,पांडुरंग भुमकर,मच्छिंद्र रोकडे,राजेश भगत,प्रविण जाधव बाळासाहेब भगवे व देशमुख कुटुंबिय उपस्थित होते. शिल्प अर्पण सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.