पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले रस्त्याचे भूमिपूजन!!

पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले रस्त्याचे भूमिपूजन!!
जिल्हा वार्षिक नियोजन समिती व पारगाव ग्रामपंचायत २०२३/२०२४ यांच्या सहकार्याने पारगाव गावठाण मुख्य बाजारपेठ रस्ता करण्यासंदर्भात ५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता.हा रस्ता चर्मकार वस्ती ते सरकारी दवाखाना येथुन करण्याचं ठरले असून या कामासाठी मा.खा.शिवाजीदादा आढळराव पाटील व मा.सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.या रस्ताच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
या प्रसंगी सरपंच श्वेता ढोबळे ,उपसरपंच नितीन ढोबळे ,ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे ,मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे,ग्रा.सदस्य काळूराम लोखंडे ,किरण ढोबळे ,सचिन ढोबळे ,अंकिता लोखंडे,लताताई ढोबळे,पोपट लबडे ,बजरंग देवडे ,श्रीकांत लोखंडे,अनिल शेवाळे,शिवाजी ढोबळे,मा .सरपंच खंडु ढोबळे,पंडुलिक ढोबळे ,बबन लोंढे,रोहिदास लोंढे, महादेव लोंढे,साईनाथ गायकवाड, ओमकार ढोबळे,दिनेश लोंढे,तुषार साबळे,ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजणे,व ग्रामंंपचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.