ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क संवर्गातील बदली प्रक्रिया पारदर्शकपणे पार !!

पंचनामा ठाणे जिल्हा प्रतिनिधी – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट-क (वर्ग 3) संवर्गातील कर्मचाऱ्यांची जिल्हांतर्गत प्रशासकीय, विनंती व आपसी बदली प्रक्रिया या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या सहभागाबरोबरच पारदर्शक निर्णयप्रक्रियेवर भर देण्यात आला. समुपदेशनाच्या माध्यमातून दि. १६ मे, २०२५ रोजी, बी. जे. हायस्कुल येथे यशस्वीरित्या पार पडली.

मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या उपस्थितीत बी. जे. हायस्कूल सभागृह, ठाणे येथे बदली प्रक्रिया पार पडली. बदली प्रक्रियेची संपूर्ण कार्यवाही पारदर्शकतेच्या निकषानुसार राबवण्यात आली असून, जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक व यूट्यूबवर दूरदृष्य प्रणालीद्वारे (Live Streaming) नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्यात आली होती.

बदली प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये विभागली गेली होती. यात आदिवासी व बिगर आदिवासी भागातील प्रशासकीय प्राधान्य, सेवा कालावधी व वास्तव्य जेष्ठतेनुसार समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर विनंती व आपसी बदल्याही समुपदेशनाद्वारे पूर्ण करण्यात आल्या.

   आज, दि. १६ मे रोजी ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी व बांधकाम विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून ग्रामपंचायत विभागातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्ग प्रशासकीय व समानिकरण मिळून एकत्रित ३५ बद‌ल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक महिला, आरोग्य परिवेक्षक व औषध निर्माण अधिकारी प्रशासकिय व विनंती बदलीस पात्र कर्मचारी नसल्याने या संवर्गातील बदल्या करण्यात आल्या नाहीत. आरोग्य सहाय्यक पुरुष प्रशासकीय ०१, विनंती ०२, आरोग्य सेवक महिला प्रशासकीय ०९, आरोग्य सेवक पुरूष प्रशासकीय ०७ , विनंती ०१ बदल्या करण्यात आल्या आहेत. कृषी विभागातील कृषी अधिकारी प्रशासकीय ००, विस्तार अधिकारी कृषी प्रशासकीय ०२, बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रशासकीय ०२ बदल्या, कनिष्ठ अभियंता स्थापत्य प्रशासकीय ०२ बदल्या करण्यात आल्या.‌

दि.‌१५ मे रोजी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क संवर्गातील बदली संदर्भातील माहिती
       अर्थ विभाग, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रशासकिय व विनंती बदलीस पात्र कर्मचारी नसल्याने त्या विभागातील बदली करण्यात आली नाही. महिला व बालकल्याण विभागातील प्रशासकीय ०१, विनंती ०० बदल्या करण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागातील प्रशासकीय ०६, विनंती ०२ बदल्या करण्यात आल्या., सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रशासकीय ०३, कनिष्ठ सहाय्यक प्रशासकीय ०७, वरिष्ठ सहाय्यक विनंती ०२, कनिष्ठ सहाय्यक विनंती ०१, कनिष्ठ सहाय्यक आपसी ०३ (६) बदल्या करण्यात आल्या व प्राथमिक शिक्षण विभागांतील प्रशासकीय ००, विनंती ०१ बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुख, अधिकारी, तांत्रिक पथक व कर्मचारी यांचे योग्य समन्वय व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनांच्या वतीने देखील आभार व्यक्त करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे सहकार्य लाभले.‌ बदल्यांनंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी नवीन कार्यस्थळी तत्काळ रुजू व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.