आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

या एक गावानं एक वेगळंच रेकॉर्ड केलंय!!तुमच्या दुष्काळा विरुद्धच्या या लढाईला मनापासून सलाम गाववाल्याहो… मानलं!!

या एक गावानं एक वेगळंच रेकॉर्ड केलंय…

“जलशोषक चर” म्हणून एक पाणी मुरवण्याचा उपचार असतो, त्याचं साधारण आकारमान असतं 5×3×2….हा जलशोषक चर एकदा भरल्यास त्याची पाणी मुरवण क्षमता असते 30 हजार लिटर. एका पावसाळ्यात साधारण तो कमीत कमी 10 वेळा भरतो. (जास्तीत जास्त जितका दिवस पावसाळा टिकेल तितका.) म्हणजे एक जलशोषक चर एका पावसाळ्यात सरासरी 30,000 × 10 = 3 लाख लिटर पाणी जमिनीत मुरवू शकतो…

या गावाने त्यापासून फुटणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कडेला, डोळ्यांना दिसेल तवर… , असे टोटल 10 नाही 100 नाही तर तब्बल 334 जलशोषक चर खणलेत.

म्हणजे
3,00,000 लिटर ×334 चर =10 कोटी 2 लाख लिटर!!!

म्हणजे 10 कोटी लिटर पाणी या गावात फक्त या एका उपचारातून मुरणाराय…!!!

आताही गावात जाऊन पाह्यलं तर याच गावातल्या या फोटोसारखं, डोळ्यांना दिसेल तिथवर, अनेक रोडच्या कडेला या अशा चर खणलेल्या दिसतात..!!

गाव : उपळाई ठोंगे.
ता : बार्शी
जि : सोलापूर.

तुमच्या दुष्काळा विरुद्धच्या या लढाईला मनापासून सलाम गाववाल्याहो… मानलं!!

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.