आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

होय…. माणुसकी अजुन जिवंत आहे!!

होय…. माणुसकी अजुन जिवंत आहे!!

मंगळवार दि.१२ सप्टेंबर २०२३ रोजी माध्यमिक विद्यालय खडकवाडी या शाळेच्या वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थी रस्त्याने मुळुकवस्ती(खडकवाडी) येथुन जात असताना अचानक एक साप मुलांच्या दिशेने रस्तावरती आला.. सापाच्या अचानक रस्त्यावर येण्याने सर्व विद्यार्थी घाबरले.त्यांच्यात गोंधळ झाला.याच गोंधळात इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कु.सानिका संतोष सूक्रे या मुलीचा पाय त्या सपावरती पडला.त्या सापाने कु.सानिका संतोष सुक्रे या मुलीच्या पायाला दशं केला आणि साप रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात निघुन गेला. झालेली घटना उपस्थित शिक्षक श्री.रोडे सर,श्री.पगार सर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, तेथे असलेल्या दादाभाऊ वाळुंज यांच्या गाडीतून सानिकाला लोणी(धामणी )येथील डाॅक्टर श्री.रसीक काळे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.डॉक्टरांनी सानिकावर लगेच उपचार चालू केले. मात्र काळे डॉक्टरांकडे संबंधित लस उपलब्ध नसल्यामुळे धामणीतील सरकारी दवाखान्यातून काही प्रमाणात लस मा.सरपंच सागर जाधव यांनी उपलब्ध करुन दिली.मात्र लसची परत गरज भासल्यामुळे खडकवाडी गावचे उपसरपंच एकनाथ सुक्रे आणि दादाभाऊ वाळुंज यांनी निरगुडसर येथून लस उपलब्ध करून आणली.

सानिकाची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दवाखान्याचा खर्च न घेण्यासाठी ग्रामस्थांनी काळे डॉक्टरांना विनंती केली. डॉक्टरांनी देखील एकही रुपया घेणार नाही, परंतु मुलीला व्यवस्थित उपचार करू अशी खात्री दिली.सानिकाची प्रकृती आता व्यवस्थित आहे.

खडकवाडी गावचे सरपंच अनिल डोके,चेअरमण नाथा सुक्रे,गुलाब वाळुंज,किरण वाळुंज यांनी लस उपलब्ध करुन दिल्या बद्दल धामणीच्या आणि निरगुडसरच्या डाॅक्टराचे आभार मानून त्यांचा सत्कार केला.तसेच डाॅ. रसीक काळे यांनी अथक प्रयत्नातुन सानिकाला योग्य ते उपचार दिल्यामुळे सानिकाचा जीव वाचला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.